घरIPL 2020IPL 2020 : कार्तिकने नाही, तर मॉर्गनने केकेआरचे नेतृत्व करावे - श्रीसंत 

IPL 2020 : कार्तिकने नाही, तर मॉर्गनने केकेआरचे नेतृत्व करावे – श्रीसंत 

Subscribe

कार्तिकला दिल्लीविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. 

कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या आयपीएल मोसमात चार पैकी दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध मोसमातील पहिला सामना गमावल्यानंतर केकेआरने सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांना सलग दोन सामन्यांत पराभूत केले होते. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना केकेआरला २१० धावा करता आल्या आणि त्यांनी हा सामना १८ धावांनी गमावला. या सामन्यात दिनेश कार्तिकला फलंदाज आणि कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे केकेआरने आता कार्तिकला कर्णधारपदावरून हटवले पाहिजे, असे ट्विट भारताचा क्रिकेटपटू श्रीसंतने केले.

पुढे येऊन नेतृत्व करणाऱ्या कर्णधाराची गरज

मला खरंच असे वाटते की, केकेआर संघाचे इयॉन मॉर्गनने नेतृत्व करावे, दिनेश कार्तिकने नाही. विश्वचषक जिंकलेल्या कर्णधाराने आयपीएल संघाचे नेतृत्व केलेच पाहिजे. केकेआर या गोष्टीचा विचार करेल अशी मला आशा आहे. त्यांना रोहित शर्मा, धोनी, विराट कोहली यांच्याप्रमाणे पुढे येऊन नेतृत्व करणाऱ्या कर्णधाराची गरज असल्याचे श्रीसंतने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले. मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने मागील वर्षी पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. मॉर्गनची कार्तिकला मदत व्हावी या हेतूनेच केकेआरने त्याला मागील वर्षी झालेल्या खेळाडू लिलावात खरेदी केले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -