अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर फिफाची मोठी कारवाई; तात्काळ प्रभावाने निलंबन

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर फिफाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय फुटबॉल फेडरेशनला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय फिफाने घेतला आहे. तसेच, 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेण्यात आले आहे.

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर फिफाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय फुटबॉल फेडरेशनला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय फिफाने घेतला आहे. तसेच, 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेण्यात आले आहे. हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. फिफाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरून निलंबन करण्याचा इशारा दिला होता. (fifa suspends all India football federation)

मिळालेल्या माहितीनुसार, फिफाच्या कार्यकारणीने सर्वसंमतीने भारतीय फुटबॉल फेडरेशनला ‘अनुचित हस्तक्षेप’ मुद्यावर निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. तसेच, फुटबॉल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर फिफाने निलंबनाचा इशारा दिला होता. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या 28 ऑगस्ट रोजी निवडणुका होणार आहेत. या प्रकरणी 17 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मंगळवार 16 ऑगस्टपासून कोलकातामध्ये ड्युरंड चषक सुरू होत आहे. या चषकाच्या दुसऱ्या दिवशी बंगळुरू एफसीचा सामना जमशेदपूर एफसीशी होणार आहे. या स्पर्धेत 11 इंडियन सुपर लीग (ISL) क्लब सहभागी होणार आहेत.


हेही वाचा – भारतीय संघाचा आम्ही पराभव करू; झिम्बाब्वेचा फलंदाज इनोसेन्ट कायाचा दावा