घरक्रीडाभारतीय संघाचा आम्ही पराभव करू; झिम्बाब्वेचा फलंदाज इनोसेन्ट कायाचा दावा

भारतीय संघाचा आम्ही पराभव करू; झिम्बाब्वेचा फलंदाज इनोसेन्ट कायाचा दावा

Subscribe

भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकल्यावर भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकल्यावर भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या सामन्याआधीच ‘भारतीय संघाचा आम्ही पराभव करू’, असा अंदाज झिम्बाब्वेचा फलंदाज इनोसेन्ट कायाने याने व्यक्त केला आहे. (Zimbabwe batter Innocent Kaia has predicted his team to win the upcoming ODI series against India)

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झिम्बाब्वेचा इनोसेन्ट म्हणाला की, ”झिम्बाब्वेचा संघ भारताविरुद्ध 2-1 च्या फरकाने वनडे मालिका जिंकेल. जोपर्यंत वैयक्तिक अपेक्षांचा प्रश्न आहे. मला सर्वाधिक धावा आणि शतके झळकावायची आहेत. ही एक साधी योजना आहे. मालिकेतील सर्वात यशस्वी फलंदाज होण्यासाठी मला फक्त धावा करायच्या आहेत. तेच माझे ध्येय असणार आहे”, असे तो म्हणाला.

- Advertisement -

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वे संघाने दमदार खेळी करत विजय मिळवला. या विजयानंतर झिम्बाब्वे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाने यजमान झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, असा इशारा झिम्बाब्वेच्या प्रशिक्षकाने दिला आहे. त्यानंतर इनोसेन्ट कायाने झिम्बाब्वेचा संघ भारताला 2-1 नं पराभूत करेल. तसेच, ज्यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंना विश्रांती दिली जाते, तेव्हा भारतीय खेळाडू गंभीरतेने क्रिकेट खेळतात. मला माहित आहे की, झिम्बाब्वेमध्ये आलेला भारतीय संघ मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध खेळणे सोपे आहे असे सांगून आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. मला खात्री आहे की, मी त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी करेल”, असेही इनोसेन्ट काया म्हणाला.

झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता यजमान झिम्बाब्वेसाठी फायदेशीर ठरू शकते, असे मत यावर्षी पदार्पण करणाऱ्या इनोसेन्ट कायाने व्यक्त केले.

- Advertisement -

भारत आणि झिबाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 22 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. तसेच हे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12:45 वाजता सुरू होणार आहेत.

भारतीय संघ –

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टण सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.


हेही वाचा – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सचिन तेंडुलकरसह ‘या’ खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -