घरक्रीडाफ्रान्स-अर्जेंटिना सामन्यावरून केरळमध्ये हिंसाचार; तीन जणांवर चाकू हल्ला

फ्रान्स-अर्जेंटिना सामन्यावरून केरळमध्ये हिंसाचार; तीन जणांवर चाकू हल्ला

Subscribe

फिफा वर्ल्डकप चॅम्पियनशिप 2022चा अंतिम सामना काल कतारमध्ये पार पडला. या स्पर्धेत फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला झाला. यावेळी अंतिम फेरीत गतविजेत्या फ्रान्सचा पराभव करुन अर्जेंटिनाने ट्रॉफी आपल्या नावावर केली. या रोमहर्षक सामन्यात अनेक टर्निंग पॉइंट्स आले. अतिरिक्त वेळेनंतर सामना 3-3 च्या बरोबरीने होता आणि पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. यामध्ये अर्जेंटिनाने ४-२ असा विजय मिळवत तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण जगात विजयाचा जल्लोष करण्यात आला. भारतातील लोकांनीही आनंद लुटला. मात्र, उत्साहाच्या भरात केरळमध्ये एक हिंसक घटना घडली. केरळच्या कन्नूरमध्ये फ्रान्स आणि अर्जेटिंना समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

केरळच्या कन्नूरमध्ये फ्रान्स आणि अर्जेंटिनाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचारात तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तीन जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पल्लियामूलाजवळ घडली. अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी फ्रेंच चाहत्यांना टोमणे मारले, त्यानंतर हिंसाचार झाला. सहा जणांना ताब्यात घेतले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे. याशिवाय कोची आणि तिरुअनंतपुरममध्येही हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. अर्जेंटिनाच्या विजयानंतर आनंद साजरा करणाऱ्या लोकांना हाताळताना दोन पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.

- Advertisement -

कोचीमध्ये एका सिव्हिल पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करून रस्त्यावर ओढले गेले. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. तिरुअनंतपुरमजवळील पोझियूरमध्ये स्क्रिनिंगच्या अंतिम सामन्यादरम्यान एका उपनिरीक्षकावर हल्ला करण्यात आला. कार्यक्रमस्थळी गोंधळ घालणाऱ्या दोन तरुणांना हटवत असताना कॉन्स्टेबलवर हल्ला करण्यात आला.

अर्जेंटिनाच्या चाहत्यांमधून अक्षय कुमार या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 नंतर तब्बल 36 वर्षांनी फिफा वर्ल्डकप जिंकला आहे. मेस्सीने सात गोलांसह स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. अंतिम फेरीत फ्रान्ससाठी हॅटट्रिक करणारा किलियन एम्बाप्पे आठ गोलांसह अव्वल स्थानावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मेस्सीची स्वप्नपूर्ती! अर्जेंटिनाने कोरले फिफा चॅम्पियनशिपवर नाव


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -