घरक्रीडाFIFA WC: कतारमध्ये आजपासून रंगणार फुटबॉल विश्वचषक, 32 संघांमध्ये चुरस

FIFA WC: कतारमध्ये आजपासून रंगणार फुटबॉल विश्वचषक, 32 संघांमध्ये चुरस

Subscribe

यंदा फिफा विश्वचषक कतारमध्ये होणार आहे. आजपासून या फिफा विश्वचषकाची सुरूवात होणार असून, पुढील 29 दिवस हा विश्वचषक रंगणार आहे. जगातील कोट्यवधी चाहते चार वर्षांपासून या स्पर्धेची वाट पाहत आहेत. यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सलामीचा सामना आज रात्री 9:30 वाजता होणार आहे.

यंदा फिफा विश्वचषक कतारमध्ये होणार आहे. आजपासून या फिफा विश्वचषकाची सुरूवात होणार असून, पुढील 29 दिवस हा विश्वचषक रंगणार आहे. जगातील कोट्यवधी चाहते चार वर्षांपासून या स्पर्धेची वाट पाहत आहेत. यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सलामीचा सामना आज रात्री 9:30 वाजता होणार आहे. परंतु, सर्वांच्या नजरा अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोन महान खेळाडूंवर असतील.

कर्णधार मेस्सीचा संघ अर्जेंटिनाचा सामना 22 नोव्हेंबरला सौदी अरेबियाशी तर रोनाल्डोच्या पोर्तुगालचा सामना 24 नोव्हेंबरला घाना संघाशी होणार आहे. मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या फुटबॉल कारकिर्दीतील हा त्यांचा शेवटचा फिफा विश्वचषक आहे.

- Advertisement -

कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्यापूर्वी संध्याकाळी साडेसात वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. यामध्ये दक्षिण कोरियाचा BTS बँड पाहायला मिळणार आहे. याशिवाय ब्लॅक आयड पीस, रॉबी विल्यमसन आणि कॅनेडियन वंशाची बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही परफॉर्म करणार आहेत.

सध्याचा विश्वविजेता फ्रान्स त्यांच्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच, ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, इंग्लंड, स्पेन, बेल्जियम, नेदरलँड्स, डेन्मार्क, पोर्तुगाल आणि गतविजेता क्रोएशिया हे विश्वचषक ट्रॉफी उंचावण्याच्या प्रमुख दावेदारांमध्ये आहेत.

- Advertisement -

फिफा विश्वचषकाचा पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात होणार आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन आणि दारूबंदीसारख्या मुद्द्यांवरून कतारला युरोपीय देशांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. यासोबतच यजमान देशावरही मॅच फिक्सिंगचा आरोप होत आहे. या वादांमध्ये यजमान संघाला विश्वचषकात चमकदार कामगिरी करून फुटबॉल जगतात आपली छाप सोडायची आहे.

लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना गट-क मध्ये आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ गट-एच मध्ये शेवटच्या स्थानावर आहे. यजमान कतार गट-अ मध्ये आहे. सर्वाधिक पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझीलला क्रोएशिया, मोरोक्को आणि कॅनडासह ग्रुप जीमध्ये स्थान देण्यात आले आहे. ब गटातील इंग्लंड संघ आपल्या पहिल्या सामन्यात इराणशी भिडणार आहे. 1982 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ फिफा विश्वचषकात आशियाई संघाशी भिडणार आहे.

फिफा विश्वचषक गट
गट                                संघ
गट अ                 कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ब गटात               इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
गट क                 अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप डी                 फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
गट ई                  स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
गट एफ               बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप जी                ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप एच               पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया


हेही वाचा – फिफा विश्वचषकाचा उद्या उद्धाटन सोहळा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड, नोरा फतेही लावणार हजेरी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -