घरक्रीडाफिफा विश्वचषकाचा उद्या उद्धाटन सोहळा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड, नोरा फतेही लावणार हजेरी

फिफा विश्वचषकाचा उद्या उद्धाटन सोहळा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड, नोरा फतेही लावणार हजेरी

Subscribe

यंदा फिफा विश्वचषक कतारमध्ये होणार आहे. २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत हा विश्वचषक होणार असून, या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. या फिफा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा उद्घाटन सोहळा दोहा येथील अल बायत स्टेडियमवर होणार आहे.

यंदा फिफा विश्वचषक कतारमध्ये होणार आहे. २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत हा विश्वचषक होणार असून, या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. या फिफा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा उद्घाटन सोहळा दोहा येथील अल बायत स्टेडियमवर होणार आहे. या ओपनिंग सेरेमनीमध्ये भारतीय अभिनेत्री नोरा फतेही देखील परफॉर्म करणार असून, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील उपस्थित राहणार आहेत. (fifa world cup 2022 opening ceremony)

२० नोव्हेंबर रोजी यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल. हा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. उद्घाटन सोहळा दोहाच्या उत्तरेस ४० किमी अंतरावर असलेल्या अल बायत स्टेडियममध्ये होणार आहे. या स्टेडियमची प्रेक्षक संख्या ६० हजार इतकी आहे.

- Advertisement -

रविवारी होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या निमंत्रणावरून धनखड २०-२१ नोव्हेंबर रोजी कतारला भेट देणार आहेत.

उद्घाटन सोहळा इथे पाहा

- Advertisement -
  • फिफा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा Sports18 आणि Sports18 HD या चॅनेलवर वर प्रसारित केला जाईल.
  • JioCinema अॅप आणि त्याच्या वेबसाइटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग देखील होणार आहे.

फिफा विश्वचषकासाठी कडक सुरक्षाव्यवस्था

  • सुरक्षेच्या कारणास्तवर कतारने युरोपमधील सर्वात मोठ्या सुरक्षा कंपनीकडून ६५ हजार कोटी रुपये खर्चून २४ लढाऊ
  • विमाने आणि ९ अत्याधुनिक हॉक MK-167 प्रशिक्षण जेट खरेदी केले होते.
  • हेलिकॉप्टर आणि त्यात वापरण्यात येणारी सुरक्षा उपकरणेही विविध कंपन्यांकडून केवळ विश्वचषकासाठी खरेदी करण्यात आली आहेत.
  • ब्रिटनचे १२ टायफून स्क्वॉड्रन कतारच्या सुरक्षेत तैनात असणार आहेत.
  • ब्रिटन कतारला विशेष सुरक्षारक्षक देखील पुरवणार असून, कतारचे राष्ट्रीय सुरक्षा केंद्र हे ड्रोन, सीसीटीव्ही आणि सेन्सरद्वारे संपूर्ण देशावर लक्ष ठेवणार आहे.

हेही वाचा – विश्वचषकातील अपयशानंतर BCCIकडून संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -