घरक्रीडापहिले हिंदकेसरी श्रीपत खंचनाळे यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

पहिले हिंदकेसरी श्रीपत खंचनाळे यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

Subscribe

अनेक मल्ल घडवण्यात श्रीपती खंचनाळे यांचे मोठे योदगान

पहिले हिंदकेसरी श्रीपत खंचनाळे यांचं आज पहाटे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी खंचनाळे यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. तेथेच त्यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र प्रकृती नाजूक असल्याने त्यांना कोल्हापुरातील महावीर विद्यालयाच्या परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज सकाळी त्यांची उपचारदम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

अनेक मल्ल घडवण्यात श्रीपती खंचनाळे यांचे मोठे योदगान होते. यासह महाराष्ट्र केसरीसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांचे विजेतेपद देखील त्यांनी पटकावले आहे. १९५९ साली दिल्ली झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी हिंदकेसरीची पहिली गदा पटकावली होती. अनेक मैदाने गाजवणारा कुस्तीपटू अशी खंचनाळे यांची ओळख होती. हिंदकेसरीपद पटकावल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी मल्लांना पराभूत केले होते. करतार पंजाबी, खडकसिंग, सादिक पंजाबी, मंगलराय, टायगर बच्चनसिंग, नजीर अहमद, मोती पंजाबी, गुलाब कादर यांसारख्या अनेक नावाजलेल्या मल्लांवर त्यांनी मात केली होती.

- Advertisement -

खंचनाळे हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील असून त्यांनी १९५९ साली पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत केले आणि हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूरची मान उंचावली. यासह त्यांनी १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धा देखील जिंकल्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -