घरताज्या घडामोडीऐतिहासिक चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते; राज ठाकरेंचं परखड मत

ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते; राज ठाकरेंचं परखड मत

Subscribe

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमधून ऐतिहासिक चित्रपटांवरुन जो वाद निर्माण होतो आहे, त्यावर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध इतिहासकार आणि अभ्यासक जयसिंगराव पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

इतिहास नुसता सांगायचा म्हटला तर रुक्ष आहे. त्यामुळे तो आणखी वेगवेगळ्या प्रकारची माहिती टाकली जाते. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये लिबर्टी घेतल्याशिवाय चित्रपट तयार करता येत नाही. तो इतिहास सांगू शकत नाही. फक्त इतिहासाला धक्का लागू न देण्याची काळजी घेण्याची गरज आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या इतिहासावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. (Raj Thackeray Comment On Historical Movies Chhatrapati Shivaji Maharaj Controversy Viral)

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमधून ऐतिहासिक चित्रपटांवरुन जो वाद निर्माण होतो आहे, त्यावर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध इतिहासकार आणि अभ्यासक जयसिंगराव पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात वीर मराठे दौडले सात यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले होते. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, दिग्दर्शकाने त्या सात जणांची नावं दिली. त्यावरुन वाद सुरु झाला. राज म्हणाले, इतिहासाबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी इतिहासकारांशी बोलतो, चर्चा करतो. यासंबंधी मी गजानन मेहंदळे यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा ते म्हणाले, जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानात ते वीर मराठे सात, आठ होते की आणखी किती होते याविषयी कोणताही दाखला नाही. आतापर्यत आपण जी नावं ऐकली ती काल्पनिक आहेत. प्रतापराव गुजरांसोबत कोणकोण होते याविषयी देखील काहीही उल्लेख नाही.

- Advertisement -

“छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रताप गुजरांना पत्र पाठवले होते त्याविषयी देखील काही माहिती नाही. आजपर्यत हे पत्र सापडलेले नाही. ते पत्र फक्त पाठवले असा उल्लेख आहे. यावर जयसिंगराव पवारही म्हणाले की, ते खरं आहे इतिहासामध्ये कागदोपत्री कोणताही संदर्भ नाही, दाखलाही नाही, ती पोवाडे आणि वेगवेगळया कथांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आहेत. महाराजांच्या काळातील ग्रंथ म्हणजे शिवभारत आहे”, असेही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले.

“इतिहास नुसता सांगायचा म्हटला तर रुक्ष आहे. त्यामुळे तो आणखी वेगवेगळ्या प्रकारची माहिती टाकली जाते. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये लिबर्टी घेतल्याशिवाय चित्रपट तयार करता येत नाही. तो इतिहास सांगू शकत नाही. फक्त इतिहासाला धक्का लागू न देण्याची काळजी घेण्याची गरज आहे”, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, संघटनात्मक विस्कळीतपणा जो आहे तो दुर करून त्याला भक्कम करणे गरजेचे होते. मी आज इथे सिंधुदुर्गमध्ये गटबाजी जी सुरू आहे, त्याला चाळण लावण्यासाठी आलोय. आणि अनेक असे पक्षाचे हितचिंतक, महाराष्ट्रसैनिक जे या सगळ्या गोष्टीला कंटाळून घरात बसलेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आज दौरा आहे.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीचे राजकारण; राज ठाकरेंचा पुन्हा शरद पवारांवर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -