घरक्रीडाFrench Open 2020 : राफेल नदाल, सेरेना विल्यम्सची विजयी सलामी 

French Open 2020 : राफेल नदाल, सेरेना विल्यम्सची विजयी सलामी 

Subscribe

नदाल फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू आहे.   

‘क्ले कोर्टचा बादशाह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदालने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची विजयी सुरुवात केली. ३४ वर्षीय नदाल फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू असून त्याने ही स्पर्धा तब्बल १२ वेळा जिंकली आहे. यंदाही त्यालाच ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. दुसरीकडे महिला एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सलाही या स्पर्धेत विजयी सलामी देण्यात यश आले. तिने पहिल्या फेरीच्या सामन्यात क्रिस्टी अहनचा ७-६, ६-० असा पराभव केला.

सामना जिंकल्याचा आनंद

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत दुसऱ्या सीडेड नदालने बेलारूसच्या इगोर गेरासीमोव्हवर ६-४, ६-४, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. ‘हा सामना जिंकल्याचा आनंद आहे. सामना जिंकण्यासाठी ज्या गोष्टी करणे गरजेचे होते, त्या मी केल्या,’ असे सामन्यानंतर नदाल म्हणाला. नदालची ही कोरोनानंतरची पहिलीच स्पर्धा आहे. त्याने याआधी झालेल्या अमेरिकन ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, इतक्या मोठ्या विश्रांतीचा त्याच्या खेळावर विपरीत परिणाम झालेला नाही. तसेच अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या डॉमिनिक थीमलाही त्याचा पहिल्या फेरीतील सामना जिंकण्यात यश आले. त्याने मरीन चिलीचचा ६-४, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चौथ्या सीडेड डॅनिल मेदवेदेव्हला मात्र पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -