घरक्रीडाCorona pandemic : जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेला पुढच्या वर्षापर्यंत स्थगिती

Corona pandemic : जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेला पुढच्या वर्षापर्यंत स्थगिती

Subscribe

इस्तंबूलमध्ये पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला मार्च २०२२ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे

कोरोना महासाथीचे संकट अजून पूर्णत: टळले नाही आणि याच कारणामुळे कित्येक क्रीड संस्था या स्पर्धेचे आयोजन करताना अतिशय खबरदारी बाळगत आहेत. याच पार्श्वभूमीवर इस्तंबूलमध्ये पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला मार्च २०२२ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. खेळाची प्रशासकीय संस्था जागतिक बॉक्सिंग महासंघातर्फे सांगितले की आजच्या घडीला देखील कोरोनाची स्थिती गंभीर आहे आणि अशा परिस्थितीत स्पर्धेचे आयोजन करण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकत नाही. या अगोदर पीटीआयने दिलेल्या वृत्तात सांगितले होते की चॅम्पियनशिपला स्थगिती देण्याचा निर्णय बेलग्रेडमध्ये झालेल्या पुरूष जागतिक चॅम्पियनशिप दरम्यान घेतला होता.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कित्येक देश तुर्कीमध्ये स्पर्धा खेळण्यास तयार नव्हते. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचे अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी राष्ट्रीय महासंघांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, “या अनुसार जागतिक बॉक्सिंगच्या महासंघाच्या संचालक मंडळाच्या सहमतीने जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपला मार्च २०२२ पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”.

- Advertisement -

स्पर्धेचे आयोजन ४ ते १८ डिसेंबर पर्यंत करण्याची योजना होती पण तुर्कीमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुर्कीमध्ये मागच्या १ दिवसात कोरोनाचे २७.८२४ नवे रूग्ण आढळूण आले. तर मागील एका दिवसात १८७ जणांचा बळी गेला. असे मानले जाते की रूग्णांमध्ये वाढ होण्याचे कारण व्हायरसचे डेल्टा स्वरूप आहे. भारताने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेनला ७० किलो वजनी गटात थेट प्रवेश दिला होता.


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -