ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने पटकावले नॉर्वे बुद्धिबळ खुल्या स्पर्धेचे विजेतेपद, व्ही प्रणीतचा पराभव

ग्रँडमास्टर प्रज्ञानंद दुसऱ्या स्थानावर असलेल्या आईएम मार्सेल एफ्रोइम्स्की, इजराइल आणि आईएम जंग मिन सेओ या स्वीडनच्या प्रतिस्पर्ध्याच्या एक गुण पुढे आहे. तर प्रणीत ६ अंकांनी तिसऱ्या स्थानी होता.

Grandmaster Pragyanand wins Norway Chess Open Championship
ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने पटकावले नॉर्वे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने नॉर्वे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी दाखवत विजेतेपद पटकावले आहेत. बुद्धिबळ ग्रुप ए स्पर्धेमध्ये ९ व्या फेरीच्या सामन्यात ७.५ गुणांनी विजय मिळवला आहे. मुख्य मानांकित प्राप्त १६ वर्षीय प्रज्ञानंदने आपली कामगिरी उत्तम ठेवून विजय कायम ठेवला आहे. त्याने शुक्रवारी रात्री उशिरा सहकारी भारतीय आंतरराष्ट्रीय मास्टर वी प्रणीतला पराभूत करुन स्पर्धेचा समारोप केला आहे.

ग्रँडमास्टर प्रज्ञानंद दुसऱ्या स्थानावर असलेल्या आईएम मार्सेल एफ्रोइम्स्की, इजराइल आणि आईएम जंग मिन सेओ या स्वीडनच्या प्रतिस्पर्ध्याच्या एक गुण पुढे आहे. तर प्रणीत ६ अंकांनी तिसऱ्या स्थानी होता. परंतु कमी टाई-ब्रेक स्कोरमुळे त्याची घसरण होऊन तालिकेत सहाव्या स्थानावर गेला. प्रणीतशिवाय प्रज्ञानंदने विक्टर मिखलेव्स्कीला आठव्या फेरीत, विटाली कुनिनला ६ व्या फेरीत, चौथ्या फेरीत मुखमदजोखिद, दुसऱ्या फेरीत सेमेन मुतुसोव, पहिल्या फेरीत माथियास उननेलैंडला मात दिली. तसेच इतर तीन सामने त्याने ड्रॉ खेळले.

प्रज्ञानंद सर्वात तरुण ग्रँड मास्टर असून त्याने वयाच्या १२ व्या वर्षी ही पदवी संपादन केली आहे. प्रज्ञानंदने दुसऱ्यांदा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केलाय. तसेच प्रज्ञानंद ग्रँड मास्टर झाल्यापासून त्याने सातत्याने आपल्या प्रगतीचा आलेख चढताच ठेवला आहे. आर प्रज्ञानानंदला दिग्गज विश्वनाथन आनंद यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आनंदची घसरण 

भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत अझरबैजानच्या शाखरियार मामेदयारोवकडून पराभव स्वीकारावा लागला. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आनंदला या पराभवाने विजेतेपदाच्या मोहिमेत जबरदस्त धक्का बसला आहे. एक अंक गमावल्यामुळे आनंद यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली होती. सातव्या फेरीनंतर ते दुसऱ्या स्थानी होते. सातव्या फेरीत त्यांनी अझरबैजानच्या तैमूर रादजाबोवला आर्मगेडनला पराभूत केलं होते. या पराभवानंतर ग्रँडमास्टर आपले दुसरे स्थान कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.


हेही वाचा : शोएब अख्तरला मास्टर ब्लास्टरने बनवलं स्टार, २३ वर्षानंतर पाकच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा