घरक्रीडाWomen's T20 Challenge 2022 : व्हेलोसिटी संघाचा पराभव करत सुपरनोव्हाने पटकावले तिसरे...

Women’s T20 Challenge 2022 : व्हेलोसिटी संघाचा पराभव करत सुपरनोव्हाने पटकावले तिसरे जेतेपद

Subscribe

महिला टी-२० चॅलेंज २०२२ (Women T20 Challenge 2022)चे जेतेपद सुपरनोव्हा संघाने पटकावले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने तिसऱ्या जेतेपदाचा दावा केल्यानंतर पुन्हा एकदा सुपरनोव्हाने सिद्ध करून दाखवले. सुपरनोव्हासने विजेतेपदाच्या लढतीत व्हेलोसिटीचा चार धावांनी पराभव केला. यापूर्वी, सुपरनोव्हाने २०१८ आणि २०१९ मध्ये महिला टी-२० चॅलेंज जिंकले होते.

व्हेलोसिटी संघाने नाणेफेक जिंकून सुपरनोव्हाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करत सुपरनोव्हासला प्रिया पुनियाने २८ आणि डिआंड्रा डॉटिनने ६२ धावा करत चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने ४३ धावांची सुरेख खेळी केली. २० ओव्हर्समध्ये ७ गडी गमावून १६५ धावा केल्या. व्हेलोसिटीसाठी केट क्रॉस, दीप्ती शर्मा आणि सिमरन बहादूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

- Advertisement -

हेही वाचा : पराभवानंतरही व्हेलोसिटी संघ महिला टी-20 चॅलेंजच्या अंतिम फेरीत

- Advertisement -

व्हेलोसिटीचा चार धावांनी पराभव

शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांनी खेळाची जोरदार सुरूवात केली. परंतु शेफालीने आठ चेंडूत पंधरा धावा काढल्या, त्यानंतर ती बाद झाली. यास्तिकाही जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही आणि चौथ्या षटकात नो बॉलमध्ये १३ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. संघाला सांभाळण्याची जबाबदारी कर्णधार दीप्ती शर्मावर होती, पण तीही दोन धावा करून बाद झाली.

स्नेह राणा आणि लॉरा वुलफार्ट यांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि सहाव्या विकेट्साठी २७ चेंडूत ४० धावा केल्या. दुसरीकडे वुलफार्टने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. एका क्षणी व्हेलोसिटीचा संघ दारुण पराभवाच्या जवळ होता आणि विजयासाठी १२ चेंडूत ३४ धावांची गरज होती. तसेच सिमरन दिल बहादूर आणि लॉरा वुलफार्ट यांनी मिळून १९ चेंडूत ४४ धावांची भागीदारी केली. मात्र, शेवटच्या चेंडूवर सहा धावा करण्यात त्यांना अपयश आलं.

यंदाचे वर्ष शेवटचे असणार

महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचे यंदाचे वर्ष शेवटचे असणार आहे. आतापर्यंत तीन वेळा महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परंतु २०२२ मध्ये ही स्पर्धा शेवटच्या वेळी आयोजित करण्यात आली. त्यामागील मुख्य कारण म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर पुढील वर्षीपासून महिला आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये ६ संघ सहभागी होणार आहेत.


हेही वाचा : Mohammad Siraj : मोहम्मद सिराजला ट्रोल केल्यानंतर आरसीबीच्या डायरेक्टरनं केलं मोठं वक्तव्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -