घरक्रीडापुलिसीचची हॅटट्रिक; चेल्सीचा विजय

पुलिसीचची हॅटट्रिक; चेल्सीचा विजय

Subscribe

इंग्लिश प्रीमियर लीग

क्रिस्टिअन पुलिसीचने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर चेल्सीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात बर्नलीवर ४-२ अशी मात केली. पुलिसीचला मागील काही सामन्यांत सुरुवातीपासूनच खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, प्रशिक्षक फ्रँक लॅम्पार्डने दाखवलेला विश्वास पुलिसीचने बर्नलीविरुद्ध सार्थकी लावला. त्याने एक गोल डाव्या पायाने, एक गोल उजव्या पायाने, तर एक गोल हेडर मारत केला. त्याच्या या कामगिरीमुळे चेल्सीने सर्व स्पर्धांत मिळून आपल्या सलग सातव्या विजयाची नोंद केली. तसेच प्रीमियर लीगमध्ये १० सामन्यांनंतर चेल्सीचे २० गुण असून ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहेत.

बर्नलीविरुद्धच्या सामन्याची चेल्सीने चांगली सुरुवात केली. या सामन्याच्या २१ व्या मिनिटाला पुलिसीचने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतर बर्नलीला बरोबरी करण्याची संधी मिळाली, पण त्यांच्या अ‍ॅशली बार्न्सने मारलेला हेडर गोलच्या वरून गेला. यानंतर चेल्सीने आपला चांगला खेळ सुरु ठेवला. मध्यंतराआधी काही सेकंद विलियानच्या पासवर पुलिसीचने आपला आणि संघाचा दुसरा गोल केला. मध्यंतरानंतर ५६ व्या मिनिटाला चेल्सीला आणखी एक गोल करण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

मेसन माऊंटच्या क्रॉसवर पुलिसीचने हेडर मारत आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि चेल्सीला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतरच विलियानने गोल करत चेल्सीची आघाडी ४-० अशी वाढवली. त्यांना ही आघाडी बराच वेळ ठेवण्यात यश आले. अखेरच्या काही मिनिटांत बर्नलीच्या जे रॉड्रिगेस आणि ड्वाइट मॅकनिलने दोन गोल करत चेल्सीची आघाडी ४-२ अशी कमी केली.

इतर निकाल :
साऊथहॅम्पटन ०-९ लेस्टर
मॅन. सिटी ३-० अ‍ॅश्टन विला
वॉटफोर्ड ०-० बोर्नमथ
ब्रायटन ३-२ एव्हर्टन
वेस्ट हॅम १-१ शेफील्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -