घरक्रीडाODI Rankings : बाबर आझमने टाकले कोहलीला मागे; फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी झेप

ODI Rankings : बाबर आझमने टाकले कोहलीला मागे; फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी झेप

Subscribe

विराट तब्बल १२५८ दिवस एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत आयसीसीच्या जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा बाबर हा पाकिस्तानचा केवळ चौथा खेळाडू आहे. २६ वर्षीय बाबरने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याने अखेरच्या सामन्यात ८२ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याच्या खात्यात १३ गुण पडले असून त्याने ८६५ गुणांसह एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले.

बाबरची दमदार कामगिरी

बाबर आणि विराटमध्ये आता आठ गुणांचा फरक आहे. बाबरने २०१० आणि २०१२ सालच्या १९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर तो २०१५ पासून पाकिस्तानच्या सिनियर संघाकडून खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरु होण्यापूर्वी त्याचे ८३७ गुण होते, तर विराटच्या खात्यात ८५८ गुण होते. मात्र, बाबरने पहिल्या सामन्यात १०३ धावांची, तर अखेरच्या सामन्यात ९४ धावांची खेळी करत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.

- Advertisement -

पाकिस्तानचा केवळ चौथा फलंदाज

सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जाणारा विराट तब्बल १२५८ दिवस एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. मात्र, आता त्याला बाबरने मागे टाकले. बाबरच्या आधी झहीर अब्बास (१९८३-८४), जावेद मियांदाद (१९८८-८९) आणि मोहम्मद युसूफ (२००३) या पाकिस्तानी फलंदाजांना एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यात यश आले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -