ICC U19 World Cup 2022: भारताने पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषकावर कोरले नाव; विजयात महाराष्ट्रातील ‘या’ खेळाडूंचा मोलाचा वाटा

icc under 19 world cup final 2022 India beat England by four wickets rajvardhan hangargekar vicky ostwal kaushal tambe
ICC U19 World Cup 2022: भारताने पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषकावर कोरले नाव; विजयात महाराष्ट्रातील 'या' खेळाडूंचा मोलाचा वाटा

अँटीगुआ, नॉर्थ साउंडच्या सर विवियन रिचड्र्स स्टेडियमध्ये अंडर-१९ विश्वचषक २०२२चा अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड खेळण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यात शानदार फलंदाजीच्या जोरावर ४ गडी राखून सामना जिंकून पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषकावर आपले नावे कोरले. पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव ४४.५ ओव्हरमध्ये १८९ धावांवर आटोपला. ४७,४ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून भारतीय संघ जिंकला. यापूर्वी भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ साली अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर आता २०२२मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंडचे ५ गडी बाद करणारा राज बावा सामनावीर ठरला आहे. भारतीय संघाने हा विजय मिळवून इतिहास रचला आहे. या विजयात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान आहे. उस्मानाबादचा राजवर्धन हंगरगेकर, पुण्याचा विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे या तरुण खेळाडूंनी विश्वचषकात उत्तम कामगिरी केली.

विश्वचषकाच्या दरम्यान भारतीय संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतरही भारतीय संघाने आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्ध दमदार कामगिरी करून विजय मिळवला आहे. या विजयामध्ये उस्मानाबादचा मूळचा असणारा राजवर्धन हंगरगेकर याचा मोलाचा वाटा आहे. अंडर-१९ विश्वचषकात राजवर्धन हंगरगेकरने फक्त गोलंदाजीनेच नाहीतर फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने आयर्लंड विरुद्ध ४५व्या ओव्हरमध्ये चांगली खेळू केली. तसेच फक्त १७ चेंडूंमध्ये नाबाद ३९ धाव्या केल्या होत्या. यामध्ये एक चौकार आणि पाच षटकार त्याने मारले होते.

या विश्वषकात पुण्यातील विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे यांनी देखील चांगली कामगिरी केली. सहा सामन्यात विकी ओस्तवालने १२ विकेट्स घेतल्या असून कौशलने अष्टपैलू कामगिरीमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान विकी ओस्तवाल विकेट घेणाऱ्यांच्या यादीत सहाव्या क्रमांवर आहे.


हेही वाचा – Ind Vs Wi, 1000 ODI Match: १००० वा एकदिवसीय सामना खेळणारा भारत पहिलाच देश, असा आहे प्रवास?