घरताज्या घडामोडीLata Mangeshkar Critical: थोड्याच वेळात नितीन गडकरी लतादीदींची भेट घेणार

Lata Mangeshkar Critical: थोड्याच वेळात नितीन गडकरी लतादीदींची भेट घेणार

Subscribe

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. जेव्हा लतादीदींची प्रकृती खालावल्याचे समोर आले, तेव्हापासून देशभरातील लोकं त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनेक मोठ-मोठे नेते, मंत्री आणि सेलिब्रिटी लतादीदींची भेट घेण्यासाठी ब्रीच कँड रुग्णालयात जात आहेत. काल, शनिवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जावून लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सकाळी नऊ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचणार आहेत. (Union Minister Nitin Gadkari to visit Lata Mangeshkar at hospital today)

दरम्यान ब्रीच कँडी रुग्णालयाला छावणीचे स्वरुप आले आहे. रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयाच्या सर्व गेटवरती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. माहितीनुसार सध्या श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक रुग्णालयात दाखल झाले आहे. तसेच रुग्णालयातील परिसरातील गाड्या हटवून नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.

- Advertisement -

काल, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घेऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. पियुष गोयल यांनी पंतप्रधान मोदींचा संदेश त्यांच्या कुटुंबियांना दिला. लवकरात लवकर लतादीदींची प्रकृती सुधारण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असा संदेश पंतप्रधान मोदींनी लतादीदींच्या कुटुंबियांना दिला होता. दरम्यान लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया आणि नंतर कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू करण्यात आले होते, त्या उपचारांनाही चांगला प्रतिसाद देत होत्या. काही दिवसांपूर्वी लतादीदींचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. तसेच त्यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला होता. पण सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Lata Mangeshkar Health Update : लतादीदींचा उपचारांना प्रतिसाद, डॉक्टरांची माहिती

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -