घरक्रीडाT20 World Cup : ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू टी-२० वर्ल्डकपला मुकणार? कर्णधाराने दिले संकेत

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू टी-२० वर्ल्डकपला मुकणार? कर्णधाराने दिले संकेत

Subscribe

राखीव फळीतील खेळाडूंनी त्यांना मिळत असलेल्या संधीचे सोने केले पाहिजे, असे फिंच म्हणाला.

ऑस्ट्रेलियन संघ लवकरच वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. मागील महिन्यात आयपीएलमध्ये खेळलेल्या डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या ऑस्ट्रेलियाच्या सात प्रमुख खेळाडूंनी या दोन्ही दौऱ्यांमधून माघार घेतली आहे. तसेच स्टिव्ह स्मिथला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत बऱ्याच नवख्या खेळाडूंना विंडीज आणि बांगलादेश दौऱ्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास त्यांचे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान निश्चित होऊ शकेल, असे कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला वाटते. तसेच ऑस्ट्रेलियाचे बरेचसे प्रमुख खेळाडू या वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता असल्याचे संकेतही त्याने दिले.

राखीव फळीतील खेळाडूंना संधी

आमचे बरेचसे प्रमुख खेळाडू टी-२० वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला मागील काही काळातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड करावी लागते. आता विंडीज आणि बांगलादेश दौऱ्यात नवख्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास त्यांचे टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघातील स्थान पक्के होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी केलेल्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करणे अवघड असते. आता राखीव फळीतील खेळाडूंनी त्यांना मिळत असलेल्या संधीचे सोने केले पाहिजे, असे फिंचने नमूद केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -