घरक्रीडाबीसीसीआयकडे अनुभवी पंचांची वानवा

बीसीसीआयकडे अनुभवी पंचांची वानवा

Subscribe

रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात लसिथ मलिंगाचा नो बॉल गाजला. मलिंगाची ती चूक पकडण्यात पंच सुंदरम रवी यांना अपयश आले आणि त्याचा फटका आरसीबीला बसला. त्यामुळे रवी यांच्या त्या चुकीवर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पण, कोहलीच्या या नाराजीनंतरही रवी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे. कारण बीसीसीआयकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले भारतीय पंचच उपलब्ध नाहीत. सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 56 सामन्यांसाठी मैदानावरील आणि टीव्ही अशा एकून 11 भारतीय पंचांची नेमणूक करण्यात आली आहेत. रवी यांना चुकीचे नकारात्मक गुण मिळतील, त्यापलिकडे बीसीसीआय कठोर कारवाई करू शकत नाही. सध्या आम्ही 17 पंचांची नेमणूक केली आहे.

त्यापैकी 11 भारतीय आणि 6 परदेशी पंच आहेत. याशिवाय 6 भारतीय पंच चौथ्या पंचाच्या भूमिकेत काम करत आहेत,’’ अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. रवी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एलिट पॅनलवर असलेले एकमेव भारतीय आहेत. त्यांनाच मलिंगाचा तो नो-बॉल पकडण्यात अपयश आले आणि बंगळुरूला 6 धावांनी सामना गमवावा लागला.

- Advertisement -

प्ले-ऑफ सामन्यातून पत्ता कट ?
रवी आणि दुसरे पंच नंदन यांना आयपीएलच्या प्ले ऑफ सामन्यातून वगळण्यात येणार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळत आहे. भारताच्या 11 पंचांपैकी केवळ 5 जणांकडेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. रवी आणि नंदन यांच्याशिवाय शामशुद्दीन, अनील चौधरी आणि नितीन मेनन हे आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये आहेत. अन्य सहा पंच स्थानिक सामन्यांत कार्यरत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -