घरक्रीडाभारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज 'करो या मरो'ची स्थिती, कोहलीला मोठा विक्रम करण्याची...

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज ‘करो या मरो’ची स्थिती, कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. मागील दोन सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 1-1 सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली आहे. त्यामुळे हा सामना दोघांसाठी महत्वाचा असणार आहे. मात्र, यासामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याची खेळी महत्वाची ठरणार आहे. कारण कोहलीने 85 धावा केल्या, तर तो एकूण टी-20 क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा गाठणारा भारताचा पहिला फलंदाज ठरणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियातील मागील दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. शिवाय, गेल्या काही सामन्यांत विराटचा फॉर्म खराब सुरू आहे. त्यामुळे रनमशीन थांबल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आजच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विराटने शतकी खेळी केल्यास ती विक्रमी ठरणार आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आजच्या तिसऱ्या T20 सामन्यात विराट कोहलीने 85 धावा केल्या, तर तो एकूण टी-20 क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा गाठणारा भारताचा पहिला फलंदाज ठरेल. आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा महान विक्रम करता आलेला नाही. विराट कोहलीने हा विक्रम केल्यास, ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठी कामगिरी असेल.

विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 351 टी-20 सामन्यांत 40.12 च्या सरासरीने 10915 धावा केल्या आहेत. यामुळे आणखी 85 धावा करताच तो टी-20 क्रिकेटमध्ये 11000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारताचा पहिला तर जगातील चौथा फलंदाज ठरणार आहे.

- Advertisement -

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

ख्रिस गेल (वेस्टइंडीज) – 463 सामने – 14562 धावा

शोएब मलिक (पाकिस्तान) – 481 सामने 11902 धावा

किरोन पोलार्ड (वेस्टइंडीज) – 613 सामने 11902 धावा

विराट कोहली (भारत) – 351 सामने 10915 धावा

डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 328 सामने 10870 धावा


हेही वाचा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2002नंतरच माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीने घेतली झेप : सानिया मिर्झा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -