IND vs AUS : दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि दीपक चहरच्या पुनरागमनाची शक्यता

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. नागपूरमध्ये हा सामना होणार असून, यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमन होण्याची चर्चा रंगली आहे.

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. नागपूरमध्ये हा सामना होणार असून, यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमन होण्याची चर्चा रंगली आहे. शिवाय, दुसऱ्या सामना विजयासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. (IND vs AUS India Faster Bawler Jasprit Bumrah and deepak chahar May be play second t20 Match)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे पुनरागमन होणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय, बुमराहबरोबर वेगवान गोलंदाज दीपक चहरला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत भारतीय संघाने चहरला बऱ्याच सामन्यांमध्ये संधी दिली नव्हती. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत त्याने पुनरागमन केले होते. त्यावेळी पहिल्याच सामन्यात तो मॅचविनर ठरला होता. त्यामुळे आता त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि उमेश यादव यांना संधी दिली होती. मात्र, या सामन्यात बुमराह आणि चहर या दोघांनाही संधी दिल्यास भुवनेश्वर कुमारला या सामन्यासाठी संघाबाहेर केले जाण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व सलामीवीर अॅरॉन फिंचने सामन्याच्या सुरूवातीलाच फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संघाला 209 धावांचे आव्हान पार करणे सहज शक्य झाले.


हेही वाचा – ‘मी पण माणूस आहे…’; राग येण्याबाबत धोनीने सांगितला किस्सा