घरक्रीडाये दिवार है कि टूटती ही नहीं है! भारताची नवी अभेद्य भिंत;...

ये दिवार है कि टूटती ही नहीं है! भारताची नवी अभेद्य भिंत; पाहा व्हिडिओ

Subscribe

भारताने ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिका २-१ अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या ३२८ धावांचं आव्हान भारताने ३ गडी राखून पार केलं. ऑस्ट्रेलियाच्या ३२८ धावांचा पाठलाग करताना भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. यानंतर शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने संघाला डाव सावरला. गील आणि पुजाराने ११४ धावांची भागीदारी केली. शुबमन गील बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने एक बाजू लावून धरली. पुजाराला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शरीराच्या दिशेने मारा करायला सुरुवात केली.

चेतेश्वर पुजारा ब्रिस्बेन कसोटीत संयमाने आणि चिकाटीने एक बाजू लावून धरली होती. पुजाराला बाद करण्यासाठी कांगारुंच्या गोलंदाजांनी पुजारावर अनेक प्रहार केले. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला. अनेक चेंडू पुजाराच्या शरीरावर आदळले. पुजारा हात, छाती, खांदा, अंगठा यावर मार सहन करत त्यावर प्राथमिक उपचार करत पुन्हा कांगारुंसमोर फलंदाजीला उभा राहिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Fox Cricket (@foxcricket)

- Advertisement -

कमिन्स आणि हेजलवूडचे चेंडू अनेकवेळा पुजाराच्या हाताला आणि डोक्याला आदळले. हेजलवूडने टाकलेला एक चेंडूने उसळी घेत पुजाराच्या अंगठ्यावर लागला. यावेळी वेदनेने कळवळत असताना पुजारा दिसला. मात्र, पुजारा न डगमगता पुन्हा खेळण्यासाठी गोलंदाजांसमोर उभा राहिला. एक चेंडू तर अतिशय जोरदार उसळी घेऊन थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. चेंडूच्या वेगाने हेल्मेटची क्लिप निघून जमिनीवर पडली. पण अनेकविध फटके अंगावर झेलून पुजाराने अतिशय शांतपणे फलंदाजी सुरू ठेवली. एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला. त्याच्या याच गुणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -

#Live : ऑस्ट्रेलियात भारतानं घडवला इतिहास, ३१ वर्षांनंतर करून दाखवली अतुलनीय कामगिरी!

#Live : ऑस्ट्रेलियात भारतानं घडवला इतिहास, ३१ वर्षांनंतर करून दाखवली अतुलनीय कामगिरी!

Powered by Restream https://restream.io/

#Live : ऑस्ट्रेलियात भारतानं घडवला इतिहास, ३१ वर्षांनंतर करून दाखवली अतुलनीय कामगिरी!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, 19 January 2021

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -