घरक्रीडाइंग्लंड विरोधात भारताचा लज्जास्पद पराभव

इंग्लंड विरोधात भारताचा लज्जास्पद पराभव

Subscribe

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत (Test Match) इंग्लंडने भारतीय संघावर विजय मिळवला आहे. हा सामना इंग्लंडने (England) ७ गडी राखून जिंकला. या विजयासह मालिकेत २-२ अशी बरोबरीही साधली.

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत (Test Match) इंग्लंडने भारतीय संघावर विजय मिळवला आहे. हा सामना इंग्लंडने (England) ७ गडी राखून जिंकला. या विजयासह मालिकेत २-२ अशी बरोबरीही साधली. इंग्लंड संघाच्या मधल्या फळीत खेळणाऱ्या जो रूटने (root) शतकी खेळी केली. रुटने नाबाद १४२ धावा केल्या. तसेच, जॉनी बेअरस्टो यानेही नाबाद ११४ धावा केल्या. दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने विजय मिळवला. (ind vs eng test series england beat india by 7 wickets)

गेल्या वर्षी भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. यातील पाचवा सामना कोरोनाच्या संकटकामुळे पुढे ढकलण्यात आला होता. १ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला गेला. आज या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची तर भारताला ७ विकेट्सची आवश्यकता होती.

- Advertisement -

भारताकडे ३७७ धावांची आघाडी

या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या डावात भारताने चेतेश्वर पुजारा (६६) आणि ऋषभ पंत (५७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर सर्वबाद २४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली होती. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत विजय मिळवला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रीज मैदानावर झाला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता.

- Advertisement -

चार कसोटी मालिकांचे निकाल

लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर झालेला दुसरा सामना भारताना १५१ धावांनी जिंकला होता. मालिकेतील तिसरा सामना लीड्मधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर झाला होता. यजमान इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ७६ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. परंतु, केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने जोरदार मुसंडी मारत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. १५७ धावांनी भारताने हा सामना जिंकला होता.

उर्वरित कसोटी मालिकेचा पाचवा सामना १ जुलैपासून खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला चांगली सुरूवात करता आली नाही. भारताचे पहिले ५ फलंदाज १०० धावांच्या आत बाद झाले. मात्र, उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला.

दोन्ही खेळाडूंनी सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या शतकी खेळीमुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद २८४ धावा करणे शक्य झाले होते. जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीमुळे त्यांना फॉलोऑन टाळण्यात यश आले.

या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे देण्यात आले होते. दुसरीकडे, इंग्लंडच्या कसोटी संघालादेखील बेन स्टोक्सच्या रुपात नवीन कर्णधार मिळाला होता. त्यामुळे दोन्ही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळत होते.


हेही वाचा – संघात स्थान न दिल्याने भारताचा ‘हा’ अष्टपैलू खेळाडू इंग्लंडमधून खेळणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -