IND vs SA : पुजाराला आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा विश्वास; म्हणाला, मागच्या दौऱ्याचा फायदा होणार

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत केवळ ८ कसोटी सामन्यांत विजय मिळाला आहे

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत (१९९२-२०१८) केवळ ८ कसोटी सामन्यांत विजय मिळाला आहे. भारतीय संघाना आपला पहिला कसोटीतील विजय २००६ मध्ये राहुल द्रविड कर्णधार असताना मिळाला होता. त्यानंतर २०१० आणि २०१८ मध्ये विजय मिळाला होता. दरम्यान भारतीय कसोटी संघातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने आगामी मालिकेत भारतीय संघ विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पुजारा सध्या भारतीय संघासोबत पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, संघाकडे यापूर्वीही आफ्रिकेत खेळल्याचा अनुभव आहे. ज्याचा संघाला आगामी मालिकेत फायदा मिळू शकतो.

पुजाराने म्हटले की, “मला आफ्रिकेतील खेळपट्टीचा अंदाज आहे आणि त्याची माहिती आहे. याआधी देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येऊन कसोटी मालिका खेळण्याचा अनुभव आगामी कसोटी मालिकेसाठी फायदेमंद ठरेल.” ३३ वर्षीय पुजाराच्या अलीकडच्या फॉर्मवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

युवा खेळाडूंच्या शानदार प्रदर्शनानंतर भारतीय संघातील दोन्ही अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर आगामी मालिकेत खूप दबाव असणार आहे. तर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी मालिकेला उजाळा देताना म्हटले की, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील चमकदार कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेत देखील शानदार खेळी करण्याचा आत्मविश्वास मिळेल.

“ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील शानदार प्रदर्शन आमच्यासाठी एक प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे ज्या पध्दतीने आमची फलंदाजी आणि गोलंदाजी आहे त्या जोरावर निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील आपण विजयाचा आत्मविश्वास बाळगू शकतो”. असे पुजाराने अधिक म्हटले.


हे ही वाचा: http://NZ vs BAN : बागंलादेशविरुद्धच्या कसोटी संघातून एजाज पटेल बाहेर; न्यूझीलंडच्या कोचने सांगितले कारण