Hockey, India Vs Pakistan: एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकला ३-१ ने हरवलं, हरमनप्रीतची उत्कृष्ट खेळी

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला ३-१ ने हरवलं आहे. टीम इंडियाचा स्टार हरमनप्रीत सिंहने चौथ्या क्वार्टरमध्ये भारतासाठी तिसरा गोल केला आणि भारताला जिंकवून दिलं. ढाकामध्ये झालेल्या या सामन्यामध्ये भारतीय संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे संघाला मोठा फायदा झाला. हरमनप्रीत सिंहने या सामन्यात २ गोल आणि आकाशदीप सिंहने एक गोल केला. पाकिस्तानकडून जुनैद मंजूरने तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरच्या मिनिटाला एकमेव गोल केला. भारताने पाकिस्तानला हरवल्यामुळे भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पुढचं पाऊल टाकू शकतो.

हरमनप्रीत सिंहने या सामन्यात दोन गोल केले आहेत. या सामन्यामध्ये पहिला आठव्या मिनिटाला आणि दुसरा ५३ व्या मिनिटाला गोल केला आहे. आकाशदीप सिंहने सामन्यात ४२ व्या मिनिटांमध्ये गोल केला आहे. बांगलादेशमध्ये होणाऱ्या या सामन्यात भारताचा दुसऱ्यांदा विजय झाला आहे. याआधी भारताने बांगलादेशला ९-० ने विजय मिळवला होता. पाकिस्तानचा पहिला सामना जापानसोबत झाला होता. परंतु तो सामना ड्रॉ झाला होता.

चौथ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून बरोबरी करण्याची संधी होती. परंतु भारतीय कर्णधार मनप्रीत सिंहच्या रेफरलमुळे दोन्ही अंपार्यसना निर्णय बदलावा लागला होता. भारतीय हॉकी संघाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक मेडल मिळालं आहे. तसेच टोक्यो ऑलम्पिकनंतर भारताची ही पहिलीच स्पर्धा आहे.


हेही वाचा : आगामी यूपी विधानसभा निवडणुकीत ३००हून अधिक जागा जिंकू, अमित शहांचा दावा