घरताज्या घडामोडीWork From Home : वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या खिशाला बसणार कात्री ;...

Work From Home : वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या खिशाला बसणार कात्री ; सरकार घेणार मोठा निर्णय

Subscribe

दोन वर्षे संपूर्ण जग हे कोरोनाच्या गर्तेत अडकले होते. त्यामुळे अनेक अत्यावश्यक सुविधा वगळता,सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते.अनेक गोष्टींवर निर्बंध लागल्यामुळे अनेक कामे ठप्प झाली होती.त्यामुळे प्रत्येक माणसांसह व्यवसायालाही आर्थिक फटका बसला.त्यामुळे व्यवसायाचे आणखी नुकसान न होण्यासाठी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केले.मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करणे बंद केले असले तरी,काही कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम अजूनही सुरुच आहे.त्यामुळे या कंपन्यामधील कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय सरकार घेणार आहे.

अजूनही वर्क फ्रॉम होम सुरु ठेवणाऱ्या कंपन्यामधील कर्मचाऱ्यांना अधिकचा कर भरावा लागणार आहे. कारण केंद्र सरकार हे कामगार कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल करण्याची परवानगी देणार असल्याचा निर्णय घेणार आहे.कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणारा रिएम्बर्समेंट संपुष्टात येण्याची शक्यता आहे.केंद्राने कंपन्यांना याबद्दल परवानगी दिल्यावर कर्मचारी सरकारला देत असलेल्या करात वाढ होऊ शकते.

- Advertisement -

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना पगारामध्ये मिळणारा हाऊस रेंट अलाऊन्स कमी होऊ शकतो. त्यामुळे टेक होम सॅलरीसुद्धा कमी होऊ शकते.एचआरए म्हणजेच हाऊस रेंट अलाऊन्स कमी झाल्यास तुम्हाला भरावा लागणारा कर वाढू शकतो.तसेच वर्क फ्रॉम होम दरम्यान तुम्ही लहान शहरांत स्थलांतरीत झाले असाल तर,तुम्हाला मिळणारा एचआर कमी केला जाऊ शकतो.याशिवाय कर्मचारी घरातून काम करत असताना होणारा खर्चाचा विचार करुनच पगाराची रचना करण्यात येणार आहे.


हे ही वाचा – नोरा, जॅकलीननंतर श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टीचेही सुकेश चंद्रशेखरबरोबर कनेक्शन

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -