घरक्रीडावृद्धिमान साहा कोरोनामुक्त; इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज

वृद्धिमान साहा कोरोनामुक्त; इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज

Subscribe

साहाला पुन्हा एकदा आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे.

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा कोरोनामुक्त झाला असून आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम काही दिवसांपूर्वी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. बायो-बबलमध्ये असतानाही काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती. यामध्ये ३६ वर्षीय वृद्धिमान साहाचाही समावेश होता. साहा या स्पर्धेत सनरायजर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता. मागील आठवड्यात त्याचा कोरोनाचा रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तो इंग्लंड दौऱ्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, आता तो कोरोनामुक्त झाला असून काही दिवसांत भारताच्या इतर खेळाडूंसोबत तो मुंबईत तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये दाखल होईल.

आपल्या घरी परतला

साहा जवळपास अडीच आठवडे दिल्लीतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन होता. परंतु, आता तो आपल्या घरी कोलकाताला परत गेला आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. आता साहाला पुन्हा एकदा आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर तो भारतीय संघाच्या मुंबईतील बायो-बबलमध्ये दाखल होऊ शकेल. इथे काही दिवस क्वारंटाईन झाल्यावर भारताचा संघ इंग्लंडला रवाना होईल.

- Advertisement -

कसोटी संघात साहाचा समावेश 

भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला १८ जूनपासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी होईल. या दोन्हीसाठी काही दिवसांपूर्वी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली असून या संघात साहाचा समावेश आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -