घरमनोरंजनप्रेक्षकांची प्रतीक्षा संपली "द फॅमिली मॅन 2" वेब सिरिजचा उद्या होणार ट्रेलर...

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली “द फॅमिली मॅन 2” वेब सिरिजचा उद्या होणार ट्रेलर आऊट !

Subscribe

19 मे रोजी 'द फॅमिली मॅन 2' वेब सिरिज ट्रेलर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओतर्फे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणून धरल्याचे दिसत आहे.

बॉलिवूड मधील अनेक बिग बजेट चित्रपटांना टक्कर देणार्‍या वेब सिरिज दिवसेंदिवस भाव खाऊन जात आहेत. सध्या सिनेमागृह बंद असल्यामुळे वेबसिरिजचा जमाना आहे असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी यांची बहूप्रतिक्षित वेब सिरिज “द फॅमिली 2″ कधी प्रदर्शित होणार याचे चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार असल्याचे दिसत आहे. 4 जून रोजी अॅमेझोन प्राइम व्हिडिओवर वेब सिरिज रिलीज होणार असल्याचे बोलण्यात येत आहे. अद्याप याबाबत अजूनही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. पण 19 मे रोजी ‘द फॅमिली मॅन 2’ वेब सिरिज ट्रेलर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणून धरल्याचे दिसत आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओतर्फे एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. आणि पोस्ट मध्ये दर्शकणा एक प्रश विचारण्यात आला आहे की,”फॅमिली मॅनच्या फॅन्ससाथी प्रश्न आहे की,उद्या दुपारी 1 वाजताचा मुहूर्त योग्य आहे का ?” या परश्नावरून असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की ट्रेलर उद्या दुपारी 1 वाजता प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

- Advertisement -

‘द फॅमिली मॅन’ ही श्रीकांत तिवारी नामक एका मध्यमवर्गीय माणसाची कथा आहे. हा माणूस आपल्या कुटुंबासमोर अत्यंत घाबरट असल्याचे नाटक करतो, तर दुसरीकडे तो भारतातील सर्वोत्कृष्ट गुप्तहेरांपैकी एक आहे. नॅशनल इंटॅलिजन्स एजन्सीच्या एका विशेष पथकासाठी काम करणाऱ्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही वेब सिरिज आहे. या वेब सिरिजचा पहिला सीझन तूफान गाजला होता तसेच चित्रपट समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांनी या सिरिजचे भरभरून कौतुक केले होते. गेल्या वर्षीच्या सीझन प्रमाणे यंदाचा सीजनही लोकांना तितकाच आवडेल का ? तसेच हा सीझन सुद्धा तितकाच लोकप्रिय ठरेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या मालिकेत मनोज बाजपेयी बरोबरच सामंथा अक्किनेनी तसेच प्रियमणी, शारीब हाश्मी, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग, सुंदीप किशन, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी झळकणार आहे.


हे हि वाचा – ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मालिकेचा प्रोमो लाँच; नात्यांच्या डोहात प्रेम की दुरावा?

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -