घरक्रीडामयांक अगरवालचे दणदणीत द्विशतक

मयांक अगरवालचे दणदणीत द्विशतक

Subscribe

सलामीवीर मयांकने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या बळावर भारताने ४०० धावांचा टप्पा सहज ओलांडला आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फलंदाज मयांक अगरवालने दणदणीत द्विशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे कसोटी कारकिर्दीतला हा त्याचा आठवा समना असून हे मयांकचे हे दुसरे द्विशतक आहे. सलामीवीर मयांकने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या बळावर भारताने ४०० धावांचा टप्पा सहज ओलांडला आहे. मयांकने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळताना द्विशतक झळकावले होते. त्याने ३७१ चेंडूत २१५ धावा केल्या होत्या. त्यामुळे मयांकवर भारतीय क्रिकेटप्रेमी प्रचंड खूश झाले आहेत.


हेही वाचा – खेळाडूंमधील मानसिक अनारोग्य गंभीर विषय!

- Advertisement -

 

३३० चेंडूत मयांकच्या २४३ धावा

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या १५० धावांबर तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी सहज १५० धावांचा टप्पा पार पडला. आता भारतीय संघ ४०० धावांवर पोहोचला आहे. भारतीय संघाच्या या कामगिरीत सलामीवीर मयांक अग्रवालची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे ३२ धावांवर असताना मयांकला जीवनदान मिळाले होते. स्लिममध्ये उडालेला त्याचा झेल इम्रूलने सोडला. या संधीचा फायदा उठवत मयांकने जबरदस्त खेळी खेळत ३३० चेंडूत २४३ धावा केल्या.

- Advertisement -

हेही वाचा – टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक, पण हुशारीने फलंदाजी गरजेची!


 

रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात परतले

मयांक अग्रवाल सोबत मैदानावर उतरलेला रोहित शर्मा स्वस्तात मैदानावर परतले. रोहित शर्माने १४ चेंडूत ६ धावा केल्या. त्यानंतर चेतेश्नर पुजाराने मयांकसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धशतक करुन पुजारा तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली शुन्यावर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य राहाणे आणि मयांक अगरवालची जोडीने पुन्हा कौतुकास्पद कामगिरी केली. मात्र, ८६ धावांवर राहाणे बाद झाला. मात्र, मयांकने आपला खेळ सुरु ठेवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -