घरक्रीडाफ्री हिट वादावर 'या' दिग्गज पंचांनी नोंदवले मत, पाकिस्तान पाठिराख्यांची बोलती बंद

फ्री हिट वादावर ‘या’ दिग्गज पंचांनी नोंदवले मत, पाकिस्तान पाठिराख्यांची बोलती बंद

Subscribe

टी-20 विश्वचषकातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात भारताने 4 विकेट ठेवून पाकिस्तानवर विजय मिळवला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानच्या पराभवानंतर अखेरच्या षटकात विराट कोहलीला मिळालेल्या फ्रि हिटवरून क्रिकेटविश्वात सध्या मोठा वाद सुरू आहे.

टी-20 विश्वचषकातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात भारताने 4 विकेट ठेवून पाकिस्तानवर विजय मिळवला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानच्या पराभवानंतर अखेरच्या षटकात विराट कोहलीला मिळालेल्या फ्रि हिटवरून क्रिकेटविश्वात सध्या मोठा वाद सुरू आहे. यावरून आता दिग्गज पंचांनी फ्रि हिटबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पाठीराख्यांची बोलतीच बंद झाली आहे. (India vs Pakistan match T20 World Cup 2022 Free hit)

भारत आणि पाकिस्तान सामन्यातील फ्रि हिटवर सध्या आजी-माजी खेळाडूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशातच दिग्गज पंच सायमन टॉफेल यांनी पाकिस्तानच्या बाजूने मांडले जाणारे मुद्दे खोडून काढले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “फ्री हिटच्या नियमानुसार फलंदाज बाद होत नाही. ज्याअर्थी फलंदाज बादच होती नाही, त्याअर्थी चेंडू स्टम्पला लागला म्हणून तो डेड होण्याचा प्रश्न येत नाही. भारत-पाक सामन्यात हेच झाल्यामुळं भारताला धावा दिल्या गेल्या”, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सायमन यांच्या या पोस्टमुळे पाकिस्तानी पाठीराख्यांची बोलतीच बंद झाली आहे. फ्री हिटच्या याच प्रसंगावरून आता पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी नियम बदलण्याची मागणी केली आहे. तर, भारताला अतिरिक्त धावा दिल्याबद्दल पंचांना दोष दिला जात आहे.

नेमका वाद काय ?

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटच्या षटकात पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजनं विराट कोहलीला कंबरेच्या वर फूलटॉस बॉल दिला. त्यावर विराट कोहलीने षटकार ठोकला. मात्र, हा बॉल नो असल्याचे विराटने पंचांच्या लक्षात आणून दिले आणि तसे आपीलही केले. पंचांनीही अंदाज घेत हा नो-बॉल असल्याचं जाहीर केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने त्यावर नाराजी व्यक्त केली. मात्र, फार ताणून न धरता सामना पुढे सुरू करण्यात आला.

या नो-बॉलमुळे भारताला फ्री हिटची संधी मिळाली. नवाजचा पुढचा चेंडू फ्री हिट होता. समोर विराट असल्याने नवाज प्रचंड दडपणाखाली होता आणि याच दबावाखाली त्याने वाइड बॉल टाकला. त्याला पुन्हा फ्री हिट बॉल टाकावा लागला. या चेंडूवर विराट बोल्ड झाला. त्यानंतर विराटने 3 धावा पूर्ण केल्या. मात्र, विराट त्रिफळाचित झाल्याने भारताला लेग बायच्या 3 धावा मिळाल्या नसाव्यात, असे पाकिस्तानी चाहत्यांना वाटले. प्रत्यक्षात या 3 धावा भारताच्या धावांमध्ये धरल्या गेल्या. त्यामुळे सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकला.


हेही वाचा – तब्बल 1.8 कोटी लोकांनी पाहिला भारत-पाकिस्तानचा लाइव्ह सामना, एक नवा विक्रम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -