घरक्रीडाIND W vs AUS W: टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार, वेळापत्रकही...

IND W vs AUS W: टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार, वेळापत्रकही जाहीर

Subscribe

भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात टी-20 मालिका होणार आहे. या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघा भारत दौऱ्यावर येणार आहे. याबाबत बीसीसीआयने शुक्रवारी घोषणा केली.

भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात टी-20 मालिका होणार आहे. या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघा भारत दौऱ्यावर येणार आहे. याबाबत बीसीसीआयने शुक्रवारी घोषणा केली. तसेच, या टी-20 मालिकेचे वेळापत्रकही जाहीर केले. (India w vs Australia w India five match t20i series in December)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, भारतीय संघ 11 ते 20 डिसेंबर दरम्यान मुंबईत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचे यजमानपद भूषवणार आहे. महिला टी-20 विश्वचषक 2023 फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला जाणार आहे, अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका 11 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर मालिकेतील शेवटचा सामना 20 डिसेंबरला खेळला जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यातील पहिले दोन सामने डीवाय पाटील स्टेडियमवर खेळले जातील. तर, उर्वरीत तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडणार असल्याची माहिती जय शाह यांनी दिली.

टी-20 मालिकेचं वेळापत्रक :

- Advertisement -

       सामना                        तारीख                  ठिकाण
पहिला टी-20 सामना        9 डिसेंबर 2022        डीवाय स्टेडियम
दुसरा टी-20 सामना         11 डिसेंबर 2022      डीवाय स्टेडियम
तिसरा टी-20 सामना        14 डिसेंबर 2022     ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम
चौथा टी-20 सामना         17 डिसेंबर 2022     ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम
पाचवा टी-20 सामना        20 डिसेंबर 2022     ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम

टी-20 विश्वचषक

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका दोन्ही देशांसाठी महत्वाची मानली जात आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया हे दोघेही 2023च्या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार आहेत.


हेही वाचा – टेबल टेनिसपटू मनिकाने ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -