घरक्रीडाWTC : टीम इंडिया अंतिम फेरी गाठणारच; इंग्लंडच्या 'या' माजी क्रिकेटपटूचे मत  

WTC : टीम इंडिया अंतिम फेरी गाठणारच; इंग्लंडच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मत  

Subscribe

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी आहे. 

विराट कोहलीच्या भारताने सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत भारताने मोठा विजय मिळवला. त्यामुळे चार सामन्यांच्या या मालिकेत भारताला २-१ अशी आघाडी मिळाली आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये होणार असून या सामन्यात भारताचे पारडे जड असल्याचे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्प्टनने व्यक्त केले. तसेच भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल, असे कॉम्प्टनला वाटते.

चौथ्या कसोटीतही भारताचे पारडे जड

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होईल असे मला वाटते. भारताला अंतिम फेरी गाठण्यापासून रोखणे आता अवघड आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीतही त्यांचेच पारडे जड आहे. भारतीय संघ परदेशात खेळत असता, तर त्यांना सामने जिंकण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली असती. परंतु, भारतीय संघ भारतात खेळत आहे आणि त्यांनी मागील दोन्ही कसोटी सामने जिंकले आहेत, हे लक्षात घेता, अखेरच्या कसोटीत इंग्लंड त्यांना पराभूत करू शकेल असे मला वाटत नाही, असे कॉम्प्टनने नमूद केले.

- Advertisement -

मोईनला विश्रांती दिल्याने नुकसान 

इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतला. परंतु, मोईन फिरकीपटू असून धावा करण्याचीही त्याच्यात क्षमता आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देत मायदेशी पाठवण्याचा इंग्लंडचा निर्णय चुकीचा होता, असे कॉम्प्टनला वाटते. मोईनला भारतात खेळण्याचा बराच अनुभव आहे. त्याने भारतात शतक झळकावले आहे. फिरकीविरुद्ध धावा कशा करायचा हे त्याला ठाऊक आहे. तसेच त्याने भारतात विकेटही घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती दिल्याने इंग्लंडचे नुकसान झाले आहे, असे कॉम्प्टन म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -