इशानचा झंझावात,भारतीय ‘अ’ संघ विजेता

येथे सुरू झालेल्या भारत ‘अ’ आणि साऊथ आफ्रिका ‘अ’ या संघांतील सामन्यात यजमान भारतीय संघाने आफ्रिका अ संघाचा 2 गडी राखून पराभव केला. आफ्रिका अ संघाने पहिल्यांदा खेळताना 21 षटकांत 5 गडी गमावून विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य भारतीय संघासमोर ठेवले होते.त्यानंतर भारताकडून इशान किशनने 24 चेंडूंत 55 धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोठा हातभार लावला.त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

धवन इन शंकर आऊट

दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध सुरु असलेल्या ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत अखेरच्या दोन सामन्यांसाठी शिखर धवनची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. विजय शंकरला अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो शेवटच्या दोन वन-डे सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. विश्वचषक स्पर्धेत शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर होता.

यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत शिखरने भारतीय संघात पुनरागमन केले. मात्र ३ टी-२० सामन्यांत २७ आणि २ वन-डे सामन्यात शिखर केवळ ३८ धावा करु शकला. त्यामुळे आपला गमावलेला फॉर्म परत मिळवण्याची शिखर धवनकडे चांगली संधी आहे.