घरक्रीडाकोरोनाचे क्रिकेटवर सावट! भारताच्या महिला संघाची कर्णधार पॉझिटिव्ह

कोरोनाचे क्रिकेटवर सावट! भारताच्या महिला संघाची कर्णधार पॉझिटिव्ह

Subscribe

कोरोनाची बाधा झाल्याचे तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. 

महाराष्ट्रासह भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता क्रिकेटवरही कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत खेळलेल्या सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, बद्रीनाथ आणि इरफान पठाण अशा भारताच्या चार माजी क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ आता भारताच्या महिला टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हरमनला मागील चार दिवस ताप होता. त्यामुळे सोमवारी तिने कोरोनाची चाचणी केली. त्यात तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका या महिला संघांमध्ये टी-२० मालिका झाली. मात्र, हरमन दुखापतीमुळे या मालिकेला मुकली.

लवकरच मैदानात पुनरागमन 

‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केले असून कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. मागील सात दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करते. देवाच्या कृपेने आणि चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे मी लवकरच मैदानात पुनरागमन करेन,’ असे हरमन तिच्या ट्विटमध्ये म्हणाली.

- Advertisement -

एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी

नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिका झाली. हरमन दुखापतीमुळे या मालिकेला मुकली. या मालिकेत हरमनच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनाने भारताचे नेतृत्व केले. भारताने ही मालिका १-२ अशी गमावली. त्याआधी झालेल्या एकदिवसीय मालिकेत मात्र हरमन खेळली होती. या मालिकेच्या चार डावांमध्ये तिने १६० धावा केल्या होत्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -