घरक्रीडाभारताच्या २००३ वर्ल्ड कप स्क्वॉडचे १५ पैकी १४ खेळाडू निवृत्त, फक्त 'हा'...

भारताच्या २००३ वर्ल्ड कप स्क्वॉडचे १५ पैकी १४ खेळाडू निवृत्त, फक्त ‘हा’ एकमेव खेळाडू क्रिकेट खेळतोय

Subscribe

भारतीय संघाच्या २००३ मधील वर्ल्ड कप स्क्वॉडपैकी एक सदस्य म्हणजे पार्थिव पटेल याने आज सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. पार्थिवने याआधी भारतीय संघाकडून शेवटचा कसोटी सामना हा दक्षिण आफ्रिकेविरोधात २०१८ मध्ये खेळला होता. तर भारतीय संघासाठी पहिल्यांदा ब्ल्यू जर्सी घालण्याचा मान पार्थिवला जून २०११ मध्ये मिळाला होता. पार्थिवने २००३ च्या संघात महत्वाची अशी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली होती. आता मात्र २००३ च्या वर्ल्ड कप स्क्वॉडपैकी एकमेव खेळाडू हा क्रिकेटसाठी योगदान देत आहे. या खेळाडूची भारतीय संघात पुनरागमन करण्याची चिन्हे मावळली असली तरीही आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये मात्र या खेळाडूचे योगदान फ्रॅंचायसीसाठी महत्वाचे असेच आहे.

आज निवृत्त झालेल्या पार्थिव पटेलने भारताकडून २५ कसोटी सामने, ३८ एकदिवसीय सामने तर दोन टी ट्वेंटी सामने खेळले आहेत. एकुण १६ वर्षे त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले. महेंद्रसिंह धोनीच्या संघात आगमनाआधी पार्थिवने भारतीय कसोटी संघात सातत्याने योगदान दिले होते. भारताच्या २००३ च्या संघातील इतर सर्वच खेळाडू या घडीला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामध्ये आज पार्थिव पटेलचीही भर पडली. पण त्याच संघातला हा खेळाडू अजुनही एका फ्रॅंचायसीसाठी खेळत आहे. २००३ च्या वर्ल्ड कपच्या एकुण १५ खेळाडूंच्या स्क्वॉडपैकी १४ जण निवृत्त झाले. पण हा खेळाडू मात्र अजुनही एक्टीव्ह क्रिकेट खेळत आहे. भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाची चिन्हे संपुष्टात आलेली असली तरीही एका आयपीएलमधील टीमसाठी हा खेळाडू सक्रीयपणे योगदान सध्याच्या घडीला तरी देत आहे.

- Advertisement -

भारतीय संघाच्या २००३ च्या टीममधील एक म्हणजे सौरभ गांगुली ज्याने कर्णधाराची भूमिका या स्क्वॉडसाठी पार पाडली होती, तो सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तर राहुल द्रविड सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीची धुरा सांभाळत आहे. संघातल्या अनेक खेळाडू क्रिकेटशी संबंधितच काही ना काही गोष्टींशी जोडले गेले आहेत. भारतीय संघ २००३ साली सलामीवीर म्हणून सौरभ गांगुली (कप्तान), सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, विरेंद्र सेहवाग, दिनेश मोंगिया, संजय बांगर, राहुल द्रविड, पार्थिव पटेल, अजित आगरकर, जहीर खान, अनिल कुंबळे, जवगल श्रीनाथ असा होता. त्यामध्ये अनिल कुंबळेसोबतच दुसरा फिरकीपटून हरभजन सिंह हादेखील होता. हरभजन सिंह हा एकमेव खेळाडू या स्क्वॉडमधून अद्यापही निवृत्त झालेला नाही. भारतीय संघाकडून हरभजन सिंहने २०१६ मध्ये युएई विरोधात टीट्वेंटीचा सामना खेळला होता. तर हरभजनने २०१५ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. हरभजनने भारतासाठी आतापर्यंत १०३ कसोटी सामने खेळले आहेत, तर २३६ एकदिवसीय सामन्यात त्याने भारताचे योगदान दिले आहे. एकुण २८ टीट्वेंटी सामने तो खेळला असून सर्वाधिक अशा विकेट्स त्याने कसोटी सामन्यात म्हणजे ४१७ इतक्या विकेट्स घेतल्या आहेत. २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये हरभजन सिंहने एकुण १० सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यानच्या कालावधीत हरभजन सिंह यांनी क्रिकेट कॉमेट्री करण्यासाठी पसंती दिली होती. त्यासोबतच इंडियन प्रिमिअर लीगमध्ये त्याने २०१८ पासून चेन्नई सुपर किंग्जसोबत सातत्याने योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये सीएसके संघाकडून खेळण्याआधी त्याने मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलचे सुरूवातीचे सामने खेळले आहेत. पण यंदाच्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात मात्र हरभजन सिंह कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे दुबईत भरवलेल्या आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळला नाही. येत्या २०२१ सालच्या मेगा ऑक्शनमध्ये पुन्हा हरभजन सिंह कोणत्या संघाकडून हरभजन सिंह खेळू शकेल का यावर मात्र प्रश्नचिन्हच आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -