घरक्रीडाIPL 2022 : हैदराबादचा गोलंदाजी कोच बनू शकतो डेल स्टेन; जाणून घ्या...

IPL 2022 : हैदराबादचा गोलंदाजी कोच बनू शकतो डेल स्टेन; जाणून घ्या कसा असणार कोचिंग स्टाफ

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग मधील सनरायझर्स हैदराबादचा संघ माजी दक्षिण आफ्रिकन गोलंदाज डेल स्टेनला संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू शकतो

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सनरायझर्स हैदराबादचा संघ माजी दक्षिण आफ्रिकन गोलंदाज डेल स्टेनला संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू शकतो. स्टेन आणि हैदराबादच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे आणि पुढील आठवड्यापर्यंत हैदराबादची फँचायझी याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. ९५ आयपीएल सामने खेळणाऱ्या स्टेनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेतला आहे. त्याने ऑगस्टच्या महिन्यातच सर्व प्रकारच्या लीगमधून संन्यास घेण्याची घोषणा केली. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक स्टेनने ९३ कसोटी सामन्यांत ४३९ बळी पटकावले आहेत. दरम्यान स्टेन हैदराबादच्या संघात टॉम मूडीसोबत काम करेल. लक्षणीय बाब म्हणजे मूडी या हंगामापासून संघाचे मुख्य प्रशिक्षक होतील. ते ट्रेवर बेलिसची जागा घेतील. त्यांनी काही दिवसांपूर्वीच हैदराबाद सोबत त्यांचा करार संपवला होता.

दरम्यान, भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू हेमंग बधानी देखील हैदराबादच्या संघासोबत जोडले जाऊ शकतात. बधानी यांनी तामिळनाडूसाठी खूप क्रिकेट खेळले होते.

- Advertisement -

डेल स्टेनने १२५ एकदिवसीय सामन्यांत १९६ बळी घेतले आहेत. तर ४७ टी-२० सामन्यांत ६४ बळी पटकावले आहेत. आयपीएलमध्ये त्यांनी डेक्कन चार्जस, गुजरात लायंस आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरूसाठी प्रतिनिधितीत्व केले आहे. या दरम्यान त्यांनी ९७ बळी घेतले आहेत.

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस, फलंदाजी प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन आणि मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी संघाची साथ सोडली आहे. त्यामुळे हैदराबादच्या संघाला नवीन कोचिंग स्टाफची गरज होती. आता टॉम मूडी, डेल स्टेन आणि बधानी हैदराबादच्या कोचिंग स्टाफचा हिस्सा बनू शकतात.

- Advertisement -

हे ही वाचा:  http://Ashes Series 2021 2nd test : पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत; वॉर्नर-लाबुशानेची शानदार खेळी


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -