घरक्रीडाIPL 2022 : दिनेश कार्तिकचा नवा विक्रम; यष्टीरक्षक म्हणून गडी बाद करण्याच्या...

IPL 2022 : दिनेश कार्तिकचा नवा विक्रम; यष्टीरक्षक म्हणून गडी बाद करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 पर्वाच्या सुरूवातीपासूनच खेळाडूंनी विक्रमाला गवसणी घालण्यास सुरूवात केली आहे. मागील आयपीएलच्या सामन्यात खेळाडूंनी विक्रम केली असून, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टीरक्षक यानं एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 पर्वाच्या सुरूवातीपासूनच खेळाडूंनी विक्रमाला गवसणी घालण्यास सुरूवात केली आहे. मागील आयपीएलच्या सामन्यात खेळाडूंनी विक्रम केली असून, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टीरक्षक यानं एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. कार्तिकने आयपीएलच्या कारकिर्दीत 150 गडी यष्टीरक्षक म्हणून घेतल्या आहेत. तसंच, या १५० विकेट्स घेत कार्तिक आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक विकेट घेणार दुसरा खेळाडू ठरला आहे.

यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नावे आहे. त्यानंतर आता यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानावर आहे. एमएस धोनीने 164 गडी बाद केले तर, दिनेश कार्तिक याने 150 गडी बाद केले आहेत.

- Advertisement -

शनिवारी झालेला आयपीएलचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. या सामन्यात कार्तिकने नाबाद 66 धावांची खेळी केली. तसंच, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने 55 धावांची शानदार खेळी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 189 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्स समोर ठेवले. मात्र, बंगळुरूचे आव्हान दिल्ली पुर्ण करण्यात अपयशी ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 16 धावांनी पराभव केला.

बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये चारवेळा विजय मिळवला. या विजयासह आयपीएलच्या गुणतालिकेत बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. तसंच, दिल्लीने आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांत तिसरा सामना गमावला.

- Advertisement -

मी मोठं लक्ष्य निश्चित केलंय

आयपीएल २०२२ च्या 15 व्या हंगामात आरसीबीचा विकेट किपर दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध झालेल्या सामन्यात दिशेन कार्तिकने उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं आहे. कार्तिकच्या या खेळीमुळे आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा १६ धावांनी पराभव केला. संघाला जिंकवून देण्यासाठी दिनेश कार्तिकसह शाहबाजने सुद्धा त्याला उत्तम साथ दिली. त्याचवेळी “मी मोठं लक्ष्य निश्चित केलंय. ते साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. देशासाठी काहीतरी मोठं करण्याचं माझं लक्ष्य आहे. हे सर्व त्या प्रवासाचा भाग आहे. मला टीम इंडियात पुन्हा जागा मिळवायची आहे. त्यासाठी मी सर्वस्व पणाला लावण्यास तयार आहे”, अशी प्रतिक्रिया दिनेश कार्तिकने दिली आहे.


हेही वाचा – 18 वर्षीय भारतीय युवा टेबल टेनिस खेळाडूचा अपघातात मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -