घरक्रीडाIPL 2022: श्रेयस अय्यरच्या हाती केकेआरची कमान, संघाला मिळाला नवा कर्णधार

IPL 2022: श्रेयस अय्यरच्या हाती केकेआरची कमान, संघाला मिळाला नवा कर्णधार

Subscribe

श्रेयस अय्यरपूर्वी पाच खेळाडूंनी केकेआरचे नेतृत्व केले आहे. सौरव गांगुली केकेआरचा पहिला कर्णधार होता, त्यानंतर गौतम गंभीर, ब्रेंडन मैक्कलम, दिनेश कार्तिक आणि मॉर्गन होते.

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) ने अधिकृतरित्या संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला करण्यात आले आहे. श्रेयस अय्यरला केकेआरने एका लिलावात १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरने केले असून त्याच्या नेतृत्वात संघाला उपविजेतेपद मिळवून दिले आहे. गेल्या हंगामात इऑन मॉर्गन केकेआरचा कर्णधार होता परंतु त्याला फ्रेंचायझीने कायम ठेवले नाही.

केकेआरचे मुख्य प्रशिक्षक मैक्कलम म्हणाले, “श्रेयस अय्यर भारताच्या भावी खेळाडूंपैकी एक म्हणून मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही श्रेयस अय्यरचे कर्णधारपदाचे कौशल्य पाहिले आहे आणि मी त्याचा आनंद घेतला आहे. कर्णधार बनल्यावर श्रेयस अय्यर म्हणाला, ‘ही संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. जगभरातील विविध दिग्गज आयपीएलमध्ये खेळण्यासाठी येत असल्याने या संघाचे नेतृत्व करताना मला आनंद होत आहे.

- Advertisement -

इऑन मॉर्गन यावेळी मेगा लिलावात होता पण तो अनसोल्ड राहिला आहे. श्रेयस अय्यरपूर्वी पाच खेळाडूंनी केकेआरचे नेतृत्व केले आहे. सौरव गांगुली केकेआरचा पहिला कर्णधार होता, त्यानंतर गौतम गंभीर, ब्रेंडन मैक्कलम, दिनेश कार्तिक आणि मॉर्गन होते.

- Advertisement -

केकेआर पूर्ण संघ : श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, अजिंक्य रहाणे, अॅलेक्स हेल्स, सॅम बिलिंग्ज, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, टिम साऊदी, उमेश यादव, रिंकू सिंह, अनुकूल रॉय, रसिख सलाम, शेल्डन जॅक्सन, बाबा इंद्रजीत, अभिजित तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, रमेश कुमार.


हेही वाचा : IPL Mega Auction 2022 : आयपीएलमध्ये १०.७५ कोटींचा पाऊस पडल्यानंतर निकोलस पूरनने दिली पिझ्झा पार्टी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -