घरक्रीडाIPL 2024: धोनी शेर तर रहाणे सवा शेर...; अजिंक्यनेही बिबट्याच्या चपळाईने घेतला...

IPL 2024: धोनी शेर तर रहाणे सवा शेर…; अजिंक्यनेही बिबट्याच्या चपळाईने घेतला कॅच; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या कारकिर्दीत अनेक खेळाडू आले आणि गेले. काही जण फिटनेसचे बळी ठरले तर काही वयामुळे क्रिकेटपासून दूर गेले. पण धोनी हे नाव आजही क्रिकेट विश्वास गाजत आहे. ते त्याच्या फिटनेसमुळे. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील IPL 2024 च्या 7 व्या सामन्यात धोनीच्या फिटनेसची झलक पाहायला मिळाली. धोनीने एक अविश्वसनीय झेल घेतला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. धोनीनंतर आता टीम इंडियाचा सीनियर खेळाडू अजिंक्य रहाणेही मागे राहिला नाही. त्यानेही बिबट्यासारखी उडी मारून झेल घेतला. (IPL 2024 Mahendra Singh Dhoni Ajinkya Rahane Ajinkya also took the catch with the agility of a leopard The video went viral)

अजिंक्य रहाणेने घेतला झेल

गुजरातचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरने धारदार शॉट खेळला. चेंडू वेगाने सीमारेषेकडे जात असल्याचे दिसत होते. मात्र 35 वर्षीय अजिंक्य रहाणेने चपळ बिबट्याप्रमाणे उडी मारून झेल घेतला. हा अप्रतिम झेल पाहून सगळेच थक्क झाले. यापूर्वी एमएस धोनीच्या आश्चर्यकारक झेलने चाहते खुश झाले होते. धोनी-धोनीच्या घोषणा होत होत्या. आता दोन्ही खेळाडूंच्या झेलच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

- Advertisement -

धोनीने 2.27 मीटर स्ट्रेच करत झेल घेतला

चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी फलंदाजी करताना चाहत्यांना अजून पाहायला मिळालेला नाही. मात्र त्याच्या फिटनेसच्या चर्चा अधिक रंगल्या आहेत. गुजरातचा अष्टपैलू विजय शंकर डॅरिल मिशेलच्या एका शानदार चेंडूने पराभूत झाला आणि चेंडू बॅटच्या काठावर जाऊन आदळला. चेंडू धोनीपासून दूर जात होता पण धोनीने 2.27 मीटर स्ट्रेच करून कॅच घेतला.

- Advertisement -

चेन्नईचा सलग दुसरा विजय

चेन्नईने आयपीएल 2024 ची सुरुवात विजयाने केली. आता चेपॉकमध्ये चेन्नईने IPL 2024 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आला. रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी 46 धावांची खेळी केली. यानंतर शिवम दुबेने फिफ्टी ठोकली. या खेळीमुळे सीएसकेने गुजरातला 207 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल गुजरातचा संघ अवघ्या 143 धावांवर गारद झाला.

(हेही वाचा: Loksabha 2024: माढ्याचा तिढा आज सुटणार? निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर भुजबळांचं भाष्य, म्हणाले…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -