घरक्रीडाभारतीय संघात नसलेले दोन खेळाडू आयपीएलच्या लिलावात

भारतीय संघात नसलेले दोन खेळाडू आयपीएलच्या लिलावात

Subscribe

आयपीएल २०२३ साठी बीबीसीसीआयने तयारी केली आहे. खेळाडूंच्या लिलावाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. २३ डिसेंबरला कोची येथे हा लिलाव होणार आहे. एकूण ४०५ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये २७३ भारतीय खेळाडू असून १३२ परदेशी खेळाडू आहेत. यासाठी १० फ्रेंचायजीचे दहा स्टाॅल लागणार आहेत. दहा संघासाठी एकूण ८७ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. 

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघात सध्या स्थान नसलेला मनिष पांडे व मयंक अग्रवाल या दोन खेळाडूंचा इंडियन प्रिमिअर लिग(आयपीएल) लिलावात समावेश करण्यात आला आहे. एक कोटी रुपयांची बोली लागणाऱ्या खेळाडूंमध्ये या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघासाठी खेळत नसले तरी आयपीएलमध्ये निवड झाल्यास हे दोन खेळाडू करोडपती होऊ शकतात.

आयपीएल २०२३ साठी बीबीसीसीआयने तयारी केली आहे. खेळाडूंच्या लिलावाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. २३ डिसेंबरला कोची येथे हा लिलाव होणार आहे. एकूण ४०५ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये २७३ भारतीय खेळाडू असून १३२ परदेशी खेळाडू आहेत. यासाठी १० फ्रेंचायजीचे दहा स्टाॅल लागणार आहेत. दहा संघासाठी एकूण ८७ खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

- Advertisement -

दोन कोटी रुपयांची बोली लागणाऱ्या खेळाडूंमथ्ये सर्व परदेशी खेळाडू आहेत. ही १९ खेळाडूंची यादी आहे. दिड कोटी रुपयांची बोली लागणारे ११ खेळाडू आहेत. एक कोटी रुपयांची बोली लागणारे २० खेळाडू आहेत. या २० खेळाडूंमध्ये मनिष पांडे व मयंक अग्रवाल यांचाही समावेश आहे. त्यांची निवड झाल्यास ते करोडपती होऊ शकतात. मयांक २१ पाच दिवसीय सामने खेळला आहे. त्याने १४८८ धावा केल्या आहेत. सध्या तो भारतीय संघात नाही. मनिष भारताच्या टी-२० संघातून ३९ सामने खेळला आहे. त्याने ७०९ धावा केल्या आहेत. भारतीय संघातून तो शेवटचा सामना जुलै २०२१ मध्ये खेळला. त्याची कामगिरी समाधानकारक नसल्याने सध्या तो भारतीय संघाबाहेर आहे.

आयपीएल २०२३ साठी पंजाब किंग्स् संघाने मयांक अग्रवालला कर्णधार पदावरुन काढून टाकले आहे. त्याच्या जागेवर शिखर धवनला कर्णधार केले आहे. कोरोनाचा फटका आयपीएल सामन्यांनाही बसला होता. भारतात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आयपीएल सामने भारताबाहेर खेळविण्यात आले होते. आता संसर्ग कमी झाल्याने आयपीएल सामने पुन्हा भारतात सुरु झाले आहेत.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -