Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : आता किंग्स इलेव्हन पंजाब संघ 'या' नावाने ओळखला जाणार! 

IPL 2021 : आता किंग्स इलेव्हन पंजाब संघ ‘या’ नावाने ओळखला जाणार! 

चाहते आणि सर्व संघमालक यांचे मत लक्षात घेऊन नवे नाव निश्चित केले गेले.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमाबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. आगामी मोसमाआधीचा खेळाडू लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत होणार आहे. या लिलावामध्ये स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या खेळाडूंना कोणता संघ खरेदी करणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. मात्र, या खेळाडू लिलावाआधी किंग्स इलेव्हन पंजाब संघाने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या संघाचे आगामी मोसमापासून ‘पंजाब किंग्स’ असे नाव असणार आहे. नेस वाडिया, प्रीती झिंटा यांच्यासह पंजाबचे सर्व संघमालक नवे नाव आणि नव्या लोगोचे बुधवारी अनावरण करणार आहेत.

फ्रेश लूक मिळण्यासाठी नवे नाव 

आम्ही चाहते आणि सर्व संघमालक यांचे मत लक्षात घेऊन पंजाब संघाचे नवे नाव निश्चित केले आहे. आमच्या फ्रेंचायझीला फ्रेश लूक आणि नवी दिशा मिळावी यासाठी म्हणून आम्ही संघाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला, असे पंजाबचे सहसंघमालक मोहित बर्मन यांनी एका क्रिकेट वेबसाईटला सांगितले. आयपीएल खेळाडू लिलावाआधी नवे नाव जाहीर करण्याचा पंजाब संघाचा प्रयत्न आहे.

दोनच वेळा प्ले-ऑफमध्ये प्रवेश

- Advertisement -

खेळाडू लिलावात पंजाबकडे खर्च करण्यासाठी सर्वाधिक पैसे आहेत. त्यांनी ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉट्रेल यांसारख्या खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे त्यांच्याकडे लिलावासाठी ५३.९ कोटी रुपये आहेत. पंजाबच्या संघाला आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी २००८ आणि २०१४ असे दोनच वेळा प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -