घरताज्या घडामोडीनो पार्किंगमधील वाहने उचलणार

नो पार्किंगमधील वाहने उचलणार

Subscribe

नाशिक पोलिसांकडून कारवाई सुरू

शहरात नो पार्किंगच्या जागी वाहने उभी करुन वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलीस पुन्हा टोईंग कारवाई सुरु करणार आहेत. त्यासाठी आता निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यानंतर येत्या काही दिवसांतच टोईंग कारवाई सुरु होणार आहे.

शहरात विविध ठिकाणी मोठया प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे मोठया प्रमाणात वाहनांची टोईंग केली जात होती. याचवेळी पोलिसांकडून वाहनांवर दंडात्मक कारवाईसाठी वाहन टोईंगसाठी खास ठेका देण्यात आला होता. टोईंग करणार्‍या ठेकेदारानला याबाबत विशिष्ट नियमावली ठरवून दिली होती. मात्र ठेकेेदार नियमावलीचे पालन करत नसल्याने नाशिक पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. या कारवाईमुळे अनेकदा नाशिक पोलीस आणि नागरीकांचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. अखेर तत्कालीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी टोईंगलाच स्थगिती दिली. मात्र बेशिस्त चालकांमुळे वाहतूक खोळंबा होण्याचे प्रमाण वाढले. कारवाई करुन, आवाहन करुनही यात सुधारणा होत नसल्याचे दिसते. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला, नो पार्किंग झोनमध्ये सर्रास वाहने उभी असल्याचे दिसते. अशा बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यासाठी पुन्हा टोइंग कारवाई सुरु करण्याचा निर्णय शहर पोलीस घेत आहे. ऑगस्ट महिन्यात तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर निविदापुर्व बैठक झाली. त्यानंतर आता वित्तीय लिफाफा उघडला जाणार असून त्यानंतर टोइंग प्रक्रिया सुरु होईल.

- Advertisement -

नियमांची सर्व पुर्तता करणार्‍यामार्फत टोईंग कारवाई केली जाईल. तसेच शहरातील सर्व भागांमध्ये ही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमार्फत वाहतूकीस शिस्त लागावी हा हेतू आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करुन वाहतूक नियमांचे पालन करावे.
पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उपआयुक्त, शहर वाहतूक शाखा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -