घरक्रीडाअँजेलो मॅथ्यूज, करुणरत्नेला वनडे संघातून डच्चू; श्रीलंकेने केली नव्या कर्णधाराची निवड 

अँजेलो मॅथ्यूज, करुणरत्नेला वनडे संघातून डच्चू; श्रीलंकेने केली नव्या कर्णधाराची निवड 

Subscribe

कुसाल मेंडिस या संघाचे उपकर्णधारपद भूषवणार आहे.

श्रीलंकन क्रिकेट संघाला मागील काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या निवड समितीने आता एकदिवसीय संघात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची बुधवारी घोषणा झाली. कर्णधार दिमुथ करुणरत्ने, अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, सलामीवीर लाहिरू थिरीमाने आणि यष्टीरक्षक दिनेश चंडिमल या अनुभवी खेळाडूंना श्रीलंकेच्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. करुणरत्नेच्या जागी आता नव्या कर्णधाराची निवड करण्यात आली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज कुसाल परेरा बांगलादेश दौऱ्यात श्रीलंकेचे नेतृत्व करेल. तसेच कुसाल मेंडिस या संघाचे उपकर्णधारपद भूषवणार आहे.

बऱ्याच नव्या खेळाडूंची निवड

एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या कुसाल परेराने आतापर्यंत १०१ एकदिवसीय, २२ कसोटी आणि ४७ टी-२० सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. तो नेतृत्व करणार असलेल्या संघात बऱ्याच नव्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज चमिका करुणरत्ने आणि फलंदाज शिरण फर्नांडो यांना पहिल्यांदा एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात तीन एकदिवसीय सामने होणार असून ते २३, २५ आणि २८ मे रोजी खेळले जातील.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -