घरक्रीडामोहालीत पंजाबी भांगडा; मुंबई पंजाबकडून पराभूत!

मोहालीत पंजाबी भांगडा; मुंबई पंजाबकडून पराभूत!

Subscribe

मोहालीमघ्ये आयपीएलच्या १२व्या सीजनमध्ये शनिवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाबने मुंबईचा पराभव करत २ गुणांची कमाई केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत झालेली मॅच शेवटच्या बॉलवर अंपायरने केलेल्या गोंधळामुळे जिंकलेल्या मुंबई इंडियन्ससमोर आज आव्हानं होतं किंग्ज इलेव्हन पंजाबचं! दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ २ गुण घेऊन टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर जाण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने घरच्या मैदानावर बाजी मारून मुंबईला धोबीपछाड दिली. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये लकने साथ दिल्यामुळे विजयाची माळ गळ्यात पडलेल्या मुंबईला यावेळी मात्र भलताच घाम गाळावा लागला. मात्र, अखेर पंजाबने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मोहालीमध्ये होम पीचवर खेळणाऱ्या आर अश्विनच्या पंजाबनं टॉस जिंकल्यानंतर फिल्डींगचा निर्णय घेतला आणि मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग लाइनअपला एकप्रकारे आव्हानच दिलं होतं. आकडेवारीचा हिशोब लावला तर ती ५०-५० होती. पंजाबनं मागच्या सीजनमध्ये मोहालीत झालेल्या सर्व ३ मॅचेस जिंकल्या होत्या. मात्र, मुंबई इंडियन्ससोबत मोहालीत झालेल्या गेल्या ४ मॅचेसमध्ये पंजाबचा पराभव झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांवर दडपण सारखंच होतं.

- Advertisement -

बॅटिंगचं आमंत्रण मिळालेल्या मुंबई इंडियन्सनं २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्सच्या बदल्यात १७६ धावा कुटल्या. यामध्ये मागच्या सामन्यात फेल गेलेल्या क्विंटन डिकॉकच्या ३९ बॉलमध्ये ठोकलेल्या झंझावाती ६० धावांचा समावेश होता. त्यामध्ये डिकॉकनं २ षटकार आणि ६ चौकार ठोकले. त्याचा सलामीचा साथीदार आणि कॅप्टन रोहित शर्मा ३२ रन्सवर तंबूत परतल्यानंतर आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात आऊट झाल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी डिकॉक आणि युवराज सिंग यांच्याक ५८ रन्सची पार्टनरशीप झाली. ६० रन्सवर डिकॉक आऊट झाल्यानंतर हार्दिक पांड्यानं पुन्हा एकदा शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी करत १९ बॉलमध्ये ३१ धावा कुटल्या.

१७७ रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या दोघा सलामीवीरांनी त्यांची जबाबदारी पुरेपूर पार पाडली. गेलने त्याच्या नेहमीच्या शैलीत २४ बॉलमध्ये ४० धावा फटकावल्या. के. एल. राहुलसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी ७ ओव्हरमध्ये ५२ रन्सची पार्टनरशीप केली. पांड्या बंधूंनी त्याला आऊट केल्यानंतर राहुलने मयांक अगरवालसोबतही ६४ रनांची भरीव भागीदारी केली. कृणाल पांड्याने त्याच्याच बॉलिंगव अगरवालचा कॅच घेतला तेव्हा पंजाबचा स्कोअर होता १३.३ ओव्हरमध्ये ११७ रन्स, आणि सलामीला आलेला राहुल खेळत होता ४० रन्सवर. शेवटी ८ बॉल राखून फक्त २ गड्यांच्या मोबदल्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने हा सामना खिशात घातला.

- Advertisement -

पंजाबच्या संपूर्ण डावामध्ये सर्वाधिक आकर्षक ठरली ती के. एल. राहुलची अर्धशतकी खेळी. मैदानात सर्व बाजूंना लगावलेल्या फटक्यांमधून त्याने आपल्या बॅटिंग टेक्निकची झलक दाखवली. त्याच्या ७० धावांच्या खेळीमध्ये १ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. मुंबई इंडियन्सच्या मलिंगापासून बुमरा, पांड्या, मॅक्लेगन अशा सर्वच बॉलर्सचा त्याने समर्थपणे सामना करत खेळपट्टीवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठाण मांडलं होतं. त्यामुळेच पंजाबचा विजय अधिक सुकर झाला.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -