घरक्रीडाIPL 2022: आयपीएलमध्ये 'या' खेळाडूने मारला 117 मीटर लांब सर्वात मोठा षटकार

IPL 2022: आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूने मारला 117 मीटर लांब सर्वात मोठा षटकार

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाच्या सुरूवातीपासून खेळाडूंनी आपली उत्कृष्ट खेळी दाखवण्यास सुरूवात केली आहे. आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंनी आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. अशातच आता पंजाब किंग्ज अष्टपैलू लियम लिव्हिंगस्टोन कालच्या सामन्यात केलेल्या खेळीची जोरदार चर्चा रंगली आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाच्या सुरूवातीपासून खेळाडूंनी आपली उत्कृष्ट खेळी दाखवण्यास सुरूवात केली आहे. आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंनी आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. अशातच आता पंजाब किंग्ज अष्टपैलू लियम लिव्हिंगस्टोन कालच्या सामन्यात केलेल्या खेळीची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लियम लिव्हिंगस्टोन याने आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील सर्वात मोठा लांब षटकार मारला आहे. लिव्हिंगस्टोनने हा षटकार गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मारला.

पंजाब किंग्ज संघाकडून फलंदाजीसाठी आलेल्या लियम लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या एकाच षटकात 3 षटकार आणि 2 चौकार मारले. त्यातील एक षटकार हा तब्बल 117 मीटर लांब गेला. हा यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार ठरला. हा षटकार पाहून गोलंदाज, फलंदाज, कर्णधार मयंक सारेच अवाक् झाले.

- Advertisement -

प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शनच्या अर्धशतकामुळे गुजरातने 20 षटकांत 143 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना लियम लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत नाबाद 30 धावा करत सामन्याचा निकाल लावला. त्याच्या खेळीतील एका षटकाराचं साऱ्यांनीच कौतुक केलं. पंजाबच्या डावात आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जॉनी बेअरस्टो एका धावेवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन व भानुका राजपक्षे यांनी दमदार फलंदाजी केली. राजपक्षे 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर लियम लिव्हिंगस्टोन मैदानात आला तेव्हा संघाला 5 षटकांत 27 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी त्याने उत्तम फलंदाजी करत या सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळवून दिला.

गुणतालिकेत टॉपर असलेल्या गुजरात टायटन्सला यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाचा पंजाब किंग्जने 8 गडी राखून पराभव केला.

- Advertisement -

एका षटकात सर्वाधिक धावा

पंजाबकडून 16व्या षटकात खेळपट्टीवर शिखर धवन आणि लियाम लिविंगस्टोन होते. लिविंगस्टोन स्ट्राईकवर होता. तसेच, गुजरातकडून गोलंदाजी करण्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आला होता. शमीने पहिला चेंडू जसा टाकला, तसा लिविंगस्टोनने 117 मीटरचा गगनचुंबी षटकार खेचला. त्यानंतर त्याने पुढच्या दोन्ही चेंडूंवर षटकार मारला. तसेच, चौथ्या चेंडूवर चौकार मारला. पुढे पाचव्या चेंडूवर 2 धाव घेतल्या आणि पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. यानंतर पुन्हा लिविंगस्टोनने चौकार मारला. त्याने शमीच्या षटकात एकूण 28 धावा कुटल्या. यामुळे तो एका षटकात सर्वाधिक धावा करणारा संयुक्तरीत्या दुसरा फलंदाज बनला.


हेही वाचा – पृथ्वी शॉचं मुंबईतील अलिशान घर पाहिलत का? किंमत वाचून व्हाल थक्क

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -