घरक्रीडाIPL 2023 : लखनऊ सुपर जायंट्सचा 'हा' वेगवान गोलंदाज IPL सोडून मायदेशी...

IPL 2023 : लखनऊ सुपर जायंट्सचा ‘हा’ वेगवान गोलंदाज IPL सोडून मायदेशी परतणार

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow super giants) संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मार्क वुड (mark wood) हा कौटुंबिक कारणासाठी मायदेशी म्हणजेच इंग्लंडचा (England) रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow super giants) संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मार्क वुड (mark wood) हा कौटुंबिक कारणासाठी मायदेशी म्हणजेच इंग्लंडचा (England) रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेत तो खेळणार आहे. (Lucknow super giants fast bowler mark wood ruled out of the ipl 2023)

मे महिन्याच्या शेवटी दुसऱ्यांदा आई-वडील होणार

- Advertisement -

मार्क वुड आणि त्याची पत्नी मे महिन्याच्या शेवटी दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहे. त्यामुळे कुटुंबाला वेळ देण्यासाठी मार्क वुड हा आयपीएल सोडून इंग्लंडला रवाना होणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊचा प्रमुख वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि त्याची पत्नी लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मावेळी उपस्थित राहण्यासाठी तो आयपीएलसोडून (IPL) इंग्लंडमध्ये परतणार आहे.

आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो इंग्लंडकडून खेळणार

- Advertisement -

इंग्लंडला गेल्यानंतर मार्क वुड आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात परतणार की नाही, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु जून महिन्यापासून आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो इंग्लंडकडून खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फलंदाजांना बाद करत पर्पल कॅपवर दावा

आयपीएल 2023मध्ये मार्क वुडने अनेक दिग्गज फलंदाजांना बाद करत पर्पल कॅपवर दावा ठोकला आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या स्पर्धेत रंगत येत असतानाच केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे.


हेही वाचा – WTC फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -