मँचेस्टर युनायटेड सर्वात मौल्यवान फुटबॉल संघ

manchester united
मँचेस्टर युनायटेड

संघाची एकून किमत ३.२ बिलियन युरोज

इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेतील नावाजलेला मँचेस्टर युनायटेड फुटबॉल संघ सर्वात महागडा संघ ठरला आहे. केपीएमजी या लेखा परिक्षण करणाऱ्या कंपनीने बुधवारी सादर केलेल्या अहवालात मँचेस्टर युनायटेड संघाची किमत ३.२ बिलियन युरोज असल्याचे जाहीर केले. तर रियल मॅड्रीड २.९ बिलियन युरोज आणि बार्सिलोना २.८ बिलियन युरोजसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

संघाकडे असणारे खेळाडु, मैदान यांच्या किंमतीवरुन संघाचे एकूण मूल्य ठरते. तसेच संघाकडे असणाऱ्या जाहीराती, स्पॉन्सरर आणि सोशल मीडियावरील दबदबा यावरही संघाचे मूल्य अवलंबून असते, असे केपीएमजीचे क्रीडा सल्लागार प्रमुख जॅक बासझुगे यांनी सांगीतले.

मँचेस्टर युनायटेड हा जगभरातील प्रसिद्ध संघापैकी एक आहे. ज्यात बरेच दिग्गज खेळाडू खेळले आहेत. यात डेव्हिड बेकहॅम, गॅरी नेव्हिल, रोनाल्डो, वेन रूनी यांचा समावेश होतो. यातील बऱ्याच खेळाडूनी हा संघ सोडला असला तरी मँचेस्टरने त्यांना पहिला फेम दिला होता. मँचेस्टर युनायटेड नुकत्याच झालेल्या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. उत्तम खेळामुळे अगदी सुरुवातीपासून मँचेस्टर एक दमदार संघ राहीला आहे. रेड डेव्हिल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मँचेस्टर युनियटेडने आतापर्यंत बरेच पुरस्कार आणि टायटल आपल्या नावावर केले आहेत.
एकूण ३२ युरोपियन क्लब पैकी बेयर्न मुनीच २.५५ बिलियन युरोजने चौथ्या तर जूवेंटस १.३ बिलियन युरोजच्या किमतीने नवव्या स्थानावर आहे. यात अकराव्या स्थानावरील पीएसजी झपाट्याने पुढे येताना दिसत आहे.

इंग्लिश प्रीमियर लीग म्हणजे काय?

इंग्लिश प्रीमियर लीग ही एक युरोपियन फुटबॉल स्पर्धा असून ह्यामध्ये इंग्लिश फुटबॉल संघ खेळताना दिसून येतात ज्यातील संघाची, खेळाडूंची तसेच पुरस्कारांची किंमत फार जास्त असते यामधील मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी, अर्सनल हे काही महत्वाचे संघ आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मॅचेस्टर सिटी जिंकली असून मॅचेस्टर युनायटेड दुसऱ्या स्थानावर राहिली. आतापर्यंत सर्वाधिक 13 विनिंग टायटलसह मँचेस्टर युनायटेड अव्वलस्थानी आहे.
भारतात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या तुलनेत युरोपमधील इंग्लिश प्रीमियर लीगमधील संघाची, खेळाडूंची तसेच पुरस्कारांची किंमत यात कमालीची तफावत दिसून येते. एकंदरीत ३२ क्लबची एकूण किमत ३२.५ बिलियन युरोज इतकी आहे. या किमतीत २०१७ मधील अहवालापेक्षा नऊ टक्क्याने वाढ झाली आहे.