घरक्रीडामयांकला शतके करण्याची कला अवगत!

मयांकला शतके करण्याची कला अवगत!

Subscribe

पुजाराचे कौतुक

कसोटी क्रिकेटमधील आपला केवळ सहावा कसोटी सामना खेळत असलेल्या भारताच्या मयांक अगरवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात १०८ धावांची खेळी केली. याआधीच्या ९ डावांमध्ये त्याने ३ अर्धशतके आणि १ शतके लगावले होते. २०१७ साली मयांकने एकाच महिन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पार केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५५ सामन्यांत ४३८९ धावा करणारा मयांक कसोटीतही मोठ्या खेळी करत असल्याचे चेतेश्वर पुजाराला आश्चर्य वाटत नाही.

मयांकने अजून फारसे कसोटी सामने खेळलेले नाहीत. मात्र, तो स्थानिक क्रिकेटमध्ये खूप वर्षे खेळत आहे. त्यामुळे त्याच्या गाठीशी बराच अनुभव आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बर्‍याच धावा केल्याचा त्याला फायदा होत आहे. तो जेव्हा ९० धावांच्या पलीकडे पोहोचतो, तेव्हा तो शतकाच्या विचाराने घाबरून खेळत नाही. तो निडर आहे. त्याला अर्धशतकांचे शतकांमध्ये रूपांतर करण्याची कला अवगत आहे.

- Advertisement -

तसेच शतक गाठल्यानंतरही तो खराब फटका मारून बाद होत नाही. त्याला मोठ्या खेळी कशा करायच्या हे ठाऊक आहे आणि आपण हे मागील सामन्यात पहिले, असे पुजारा म्हणाला. मयांक आणि पुजारा यांनी दुसर्‍या कसोटीत १३८ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला.

त्याला सल्ल्याची गरज नाही!
मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसर्‍या कसोटीत१३८ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. या भागीदारीदरम्यान तू मयांकला काही सल्ला दिलास का, असे विचारले असता पुजारा म्हणाला, त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटपासूनच मोठ्या धावा करण्याची सवय आहे. त्यामुळे मला मयांकला काही सल्ला द्यावा लागला नाही. आम्ही फक्त योजनांबाबत चर्चा करत होतो. तो जर काही चूक करत असेल, तर मी त्याला सुधारणा करण्यास सांगत होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -