घरक्रीडाधोनीच्या निवृत्तीनंतर पत्नी साक्षीची प्रतिक्रिया, म्हणाली...

धोनीच्या निवृत्तीनंतर पत्नी साक्षीची प्रतिक्रिया, म्हणाली…

Subscribe

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शनिवारी धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. एक छोटोसा व्हिडिओ पोस्ट करत आणि ‘मे पल दो पल का शायर हूं’ असे म्हणत त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे कोट्यावधी भारतीय चाहत्यांनी मोठा धक्का बसला. धोनीने अचानक जाहीर केलेल्या निवृत्ती हा सर्वच क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का होतो. धोनीच्या आंततराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पत्नी साक्षीने देखील आता प्रतिक्रिया इन्स्टाग्रामवर दिली आहे.

साक्षीने लिहिले आहे की, ‘तु जे काही मिळवलं आहेस त्याचा तुला गर्व असला पाहिजे. क्रिकेटमध्ये आपलं सर्वोत्तम योगदान दिल्याबद्दल अभिनंदन. तुझ्या यशाबद्दल आणि तुझ्याबद्दल मला गर्व आहे. मला खात्री आहे की, जीव की प्राण असणाऱ्या क्रिकेटला निरोप देताना तु तुझ्या अश्रूंना थांबवून ठेवले असणार. तुला चांगले आरोग्य, आनंददायी जीवन आणि भविष्यात शानदार गोष्टी मिळाव्यात, एवढीच इच्छा व्यक्त करते.’

- Advertisement -

कोरोनाच्या काळात धोनी त्याच्या रांची येथील फार्म हाऊसवर कसा वेळ घालवत आहे, हे साक्षीच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कळते. सध्या धोनी सेंद्रीय शेती करत असल्याचे वृत्त समोर आले होते. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल देखील झाले होते. दरम्यान धोनी २०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत सामन्यात न्यूझीलंडनकडून भारताचा पराभव झाल्यापासून कोणत्याही सामन्यात खेळलेला नाही. सध्या धोनी आगामी आयपीएलची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएल खेळल्या जाणार आहे. यासाठी आता धोनी सज्ज झाला असून आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. २० ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धोनीने आधीच दिली होती BCCI ला निवृत्तीची कल्पना, पत्रात लिहिलं होतं….


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -