घरक्रीडाDhoni Birthday : 'कॅप्टन कुल'चा ४० वा वाढदिवस; कोहली, रैनाकडून लाडक्या कर्णधाराला...

Dhoni Birthday : ‘कॅप्टन कुल’चा ४० वा वाढदिवस; कोहली, रैनाकडून लाडक्या कर्णधाराला शुभेच्छा

Subscribe

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही आपल्या स्पेशल स्टाईलमध्ये धोनीला शुभेच्छा दिल्या.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज (७ जुलै) ४० वा वाढदिवस आहे. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता. तसेच तो कर्णधार असतानाच भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्यातही यश आले होते. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. ‘कॅप्टन कुल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचे भारतीय क्रिकेटला असलेले योगदान क्रिकेट चाहत्यांच्या आणि अन्य खेळाडूंच्या कायम लक्षात राहणार आहे.

कर्णधार असताना धोनीने विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि अश्विन यांसारख्या प्रतिभावान युवा खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी दिली होती. त्याने दाखवलेल्या विश्वासामुळेच या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुढे भारताकडून खेळताना दमदार कामगिरी केली. आपल्या लाडक्या कर्णधाराच्या ४० व्या वाढदिवशी कोहली आणि रैना यांच्यासह भारताच्या अन्य आजी-माजी खेळाडूंनीही धोनीला शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

- Advertisement -

तसेच भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही आपल्या स्पेशल स्टाईलमध्ये धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धोनी आणि सेहवाग अनेक वर्ष भारताकडून एकत्र क्रिकेट खेळले.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -