घरक्रीडालग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने धोनीने साक्षीला दिले 'हे' खास गिफ्ट

लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने धोनीने साक्षीला दिले ‘हे’ खास गिफ्ट

Subscribe

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. धोनी आणि साक्षीच्या लग्नाला आज ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने धोनीने आपल्या बायको साक्षीला एक खास, सुंदर गिफ्ट दिले आहे. धोनीने साक्षीला काय गिफ्ट दिले आहे, याचे फोटो स्वतः साक्षीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. साक्षीने इन्स्टाग्राम स्टोअरीवर एक विंटेज कारचा फोटो शेअर करून लग्नाच्या वाढदिवसाच्या या गिफ्टबद्दल धोनीचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

तिच्या या पोस्टवर धोनी आणि साक्षीच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. साक्षीने ज्या कारचा फोटो शेअर केला आहे, ती कार खूपच दमदार दिसत आहे.

धोनीने साक्षीसोबत ४ जुलै २०१०ला देहरादूनमध्ये लग्न केले होते. दोघांना एक सुंदर मुलगी असून तिचे नाव जीवा असे ठेवण्यात आले आहे. साक्षी नेहमी सोशल मीडियावर जीवा आणि धोनीचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. एक दिवसापूर्वी साक्षीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये धोनीच्या विंटेज कारचे कलेक्शन दिसत होते. जगभरातील क्रिकेटच्या सर्व चाहत्यांना याबाबत माहिती आहे की, धोनीला किती गाड्यांचे क्रेज आहे. रांचीमध्ये जन्मलेल्या या सुपरस्टार खिलाडी जवळ आपल्या गॅरेजमध्ये लग्जरी कार आहेत. ज्यामध्ये पोर्शे 911, फरारी 599 GTO, Nissan Jonga, जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक, लँड रोवर फ्रीलँडर २ आणि ऑडी क्यू ८ अशा अनेक कार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

- Advertisement -


हेही वाचा – Video: घटस्फोट घेतल्यानंतर आमिर, किरणचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांना म्हणाले…


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -